For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ड्रेनेज चेंबरवर ठेवला रहदारी पोलिसांनी ‘कोन’

11:04 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
ड्रेनेज चेंबरवर ठेवला रहदारी पोलिसांनी ‘कोन’
Advertisement

बेळगाव : कोल्हापूर सर्कल येथे चेंबर खराब झाला असून, त्यावर काँक्रीटचे मोठे झाकण ठेवण्यात आले आहे. त्या झाकणावर रहदारी पोलिसांनी  ‘कोन’ ठेवला आहे. यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे. महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे रहदारी पोलिसांनाच त्याची खबरदारी घ्यावी लागली आहे. कोल्हापूर सर्कलजवळ रहदारी सिग्नल आहे. त्याच ठिकाणी हा कोन ठेवण्यात आला आहे. सिग्नल असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र ड्रेनेज चेंबवरवर काँक्रीटचे मोठे झाकण ठेवण्यात आले आहे. त्या चेंबरची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नाही. काँक्रीटचे मोठे झाकण असल्यामुळे अपघातही घडू शकतो. त्यामुळे पोलिसांनी त्यावर कोन ठेवला आहे. स्मार्ट सिटीमध्ये अशा प्रकारे कामे करण्यात आली आहेत. याबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. त्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी आणि ती समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.