राधानगरी येथील मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यामुळे वाहतुक धोकादायक
राधानगरी / वार्ताहर
निपाणी-देवगड राज्यमार्गावरील राधानगरी येथे गावठाणकडे जाणाऱ्या व जैन बस्ती जवळ असलेल्या संरक्षक भिंतीजवळील गेली दोन महिने खुदाई करून ठेवलेला रस्त्याच्या कडेला कमीत कमी 10 फूट चर मारून ठेवला आहे, त्यामुळे याठिकाणी वाहतूक करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते,वाहनधारकांच्या माहिती साठी निदान एखादा फलक उभा करावा, अशी मागणी होत आहे , तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबधीत कंपनीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या चर मुजवावीत अशी मागणी स्थानिक रहिवासी व वाहनधारकांकडून होत आहे.
गेल्या चार महिन्यापासून गगनबावडा घाट रस्त्याच्या कामामुळे बंद असल्याने तळ कोकणात जाणारी अवजड वाहतूक राधानगरी मार्गे सुरू आहे,राधानगरी ते फोंडा हा घाटमार्ग असल्याने ठिकठिकाणी संरक्षक कठडे व मोऱ्याचे बांधकाम सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी संरक्षक कठड्याभोवती चरी बुजवलेल्या नाहीत त्यामुळे अवजडवाहने चालवतीना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, कठडा पूर्ण होऊन दोन महिने पूर्ण झाले तरी अद्यापही चर बुजवणे संबंधिताकडून कोणत्याही प्रकारची हालचाली सुरू नाहीत, संभाव्य धोका लक्षात घेऊन हा चर मुजवून घ्यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी व वाहनधारकांकडून होत आहे.