For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर मध्य मुंबईत महिला खासदारांची परंपरा कायम

06:26 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तर मध्य मुंबईत महिला खासदारांची परंपरा कायम
Advertisement

उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ 2009 साली निर्माण करण्यात आला. यावेळी 2009 साली कॉग्रेसच्या प्रिया दत्त या खासदार होत्या. त्यांच्यापुर्वी हा मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई म्हणून ओळखला जात होता.या मतदार संघातुन रोझा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते या महिलांनी या मतदारसंघात नेतफत्व केले होते. 2009 नंतर प्रिया दत्त खासदार झाल्या. त्यानंतर 2014 आणि 2019 साली असे दोन वेळा येथून पूनम महाजन भाजपच्या तिकिटावर निवडून येत होत्या. मात्र 2024 ला हे चित्र बदलून येथे उज्वल निकम निवडून येतील अशी अटकळ बांधण्यात येत होती. त्यानुसार निकम यांनी 55 हजारांचे लीड देखील घेतले होते.मात्र शेवटच्या तीन फ़ेर्यात चित्र पालटले आणि वर्षा गायकवाड या 4 हजार मतांनी निवडून आल्या.यामुळे पून्हा एकदा या मतदारसंघात महिला खासदाराची परंपरा कायम राहीली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.