महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंधारात गेलेल्या महाराष्ट्रासाठी ‘मशाल’ पेटवावीच लागेल!

06:50 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एक रहा, महाराष्ट्र ‘सेफ’ ठेवा - देवगड येथे संदेश पारकर यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांचा नारा

Advertisement

प्रतिनिधी/ देवगड

Advertisement

मुंबईवर महाराष्ट्राचा, कोकणी माणसाचा अधिकार आहे. मात्र, हीच मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा डाव मोदी सरकार करीत आहे. मुंबईतील 1080 एकर जमीन अदानीला फुकटात दिली जात आहे. पण राज्यकर्त्यांकडून मराठी माणसाला मुंबईमध्ये एक इंचही जमीन फुकट दिली जाणार नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेले गेले. महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला नेला गेला. महाराष्ट्र अंधारात नेण्याचे काम मोदी सरकारने केले. गेल्या दोन वर्षांत अंधारात गेलेल्या महाराष्ट्रासाठी शिवसेनेची मशाल पेटवावीच लागेल. त्यामुळे सगळ्यांनी एक रहा, महाराष्ट्राला ‘सेफ’ ठेवा, असा नारा उबाठा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देवगड येथील प्रचार सभेत दिला. शिवसेनेचे हिंदुत्व हे चूल पेटविणारं, तर भाजपचे हिंदुत्व हे घर पेटविणारं असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

कणकवली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील मविआचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत श्री. ठाकरे यांनी मोदी सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपवर टीका केली. व्यासपीठावर उमेदवार संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, गौरीशंकर खोत, माजी आमदार परशुराम उपरकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, युवक काँग्रेसचे जिल्हाप्रमुख किरण टेंबुलकर, उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बुवा तारी, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरिद काझी, माजी तालुकाप्रमुख अॅड. प्रसाद करंदीकर, स्वप्नील धुरी, तालुका महिला संघटक हर्षा ठाकुर, सायली घाडीगावकर, रवींद्र जोगल आदी मविआ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘कमल खिलने के लिए किचड लगता है’ असे म्हटलं जातं. पण या महाराष्ट्रात भाजप किती चिखल करणार आहे? भाजपने गुजरातमधून सुमारे 90 हजार लोकं प्रचारासाठी महाराष्ट्रात आणली आहेत. भाजप गुजरातचे प्रेम महाराष्ट्रावर लादत आहे. मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व आहे. तरीही या मराठी माणसाला मुंबईबाहेर काढून राज्याची आर्थिक राजधानी अदानींच्या ताब्यात देण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपसाठी ‘सबका मालिक अदानी’ असून तेच त्यांचे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रावर पर्यावरणाला घातक असलेले प्रकल्प लादायचे. त्याची राख मुंबईमध्ये, तर रांगोळी गुजरामध्ये काढायची. कोकणातही पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प आणायचे. पण, कोकणात राखेचे प्रकल्प नकोत. कोकणात पर्यटनात्मक प्रकल्प हवेत. शाश्वत विकासाचे पर्यटन प्रकल्प येथे उभे राहायला पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची अस्मिता मारण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसून डरपोक गद्दारांनी सरकार पाडले. आमचा पक्ष चोरला, पक्ष चिन्ह चोरले. स्वत:च्या स्वार्थासाठी या डरपोक गद्दारांना साथ देणाऱ्यांना निवडणूक लावायची हिंमत मात्र झाली नाही. तो क्षण आता आला आहे. परिवर्तनाची वेळ आता आली आहे. महाराष्ट्राला मागे कसे न्यायचा, महाराष्ट्राची अस्मिता मारून कशी टाकायची, हा प्रयत्न भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रातील राजवट करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. आमचे हिंदुत्व हे ‘हृदयात राम आणि हाताला काम’ अशा प्रकारचे आहे. भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आमचा धर्म पोकळ नाही. सत्ताधाऱ्यांकडून हिंदू मुस्मिलमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फसव्या योजनेमधून दिली जाणारी आश्वासने ही आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी आहेत. 2014 मध्ये भाजप सरकारने प्रत्येकाला 15 लाख ऊपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता दहा वर्षांनी पंधराशे ऊपये देऊ केले आहेत. पण, हीच भाजप पुन्हा सत्तेत आली तर पंधराशेचे दोन शून्य काढून घेऊन 15 ऊपये हातात देतील. महाराष्ट्रात सध्या बेरोजगारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोदी सरकार नवी रोजगार निर्मिती करू शकले नाही. त्यांनी केवळ महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्रात शासन आहे कुठ़े? महिलांवर अत्याचार होत असताना लाडके भाऊ गेले कुठे होते? पण मविआ सरकार सत्तेत आल्यास महिलांच्या सुरक्षितेसाठी शक्ती कायदा आणला जाईल. आज महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागातून महाविकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिवर्तन अटळ आहे, असे त्यांनी सांगितले.

देवगडचा आंबा जगप्रसिद्ध असून या आंबा व्यवसायाला चालना देण्यासाठी येथे जागतिकस्तरावरचा फूड प्रोसेसिंग युनिट प्रकल्प राबविण्यासाठी मविआ सरकारचे प्रयत्न राहणार आहे. खासगी विमा कंपन्यांकडून आंबा, काजू बागायतदारांची मोठी फसवणूक केली जात आहे. या आंबा व काजू बागायतदारांसाठी मविआ सरकार सत्तेत आल्यास प्रयत्न करेल, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

उमेदवार संदेश पारकर म्हणाले, या मतदारसंघाला वैचारिक परंपरा होती. माजी आमदार कै. केशवराव राणे, स्व. आप्पासाहेब गोगटे यांनी या मतदारसंघात सुसंस्कृतपणा जपला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांत ही ओळख पुसली गेली आहे. गेल्या 35 वर्षे जिल्ह्यात घराणेशाही करणाऱ्या कुटुंबाच्या संपत्तीत वाढ झाली. मात्र, जनतेला काही मिळाले नाही. आपला लढा या प्रस्थापितांविऊद्ध, भ्रष्टाचाराविऊद्ध, घराणेशाहीविऊद्ध आहे. या मतदारसंघातील सत्ताधारी जर विकास केला म्हणत असतील तर ते मतांसाठी पैशांचा वापर का करीत आहेत? विकासाच्या मुद्द्यावरच मत मागा. या निवडणुकीसाठी मर्दासारखे लढण्याची हिंमत पण विरोधी उमेदवारात नाही. मतांच्या विभाजनासाठी एका मुस्लिम उमेदवाराला तसेच माझ्या नावासारखे साधर्म्य असलेल्या अजून एका उमेदवाराला या मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने विद्यमान सत्ताधारी उमेदवाराने गावागावात आपल्या विश्वासातील माणसे ठेवली. ही माणसे गुंडगिरी करीत आहेत. आपण जनसेवक आहोत. जनसेवकाला जनतेची भीती असली पाहिजे. राज्यकर्त्यांना जनतेची किंमत वाटली पाहिजे. सामान्य जनतेचा आवाज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून बुलंद करून आपणाला जनसेवेची एक संधी द्यावी. मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सुशांत नाईक, सतीश सावंत, गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, अतुल रावराणे, स्वप्नील धुरी, विवेक ताम्हणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोटकामते, पोयरे गावातील कार्यकर्त्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article