विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचा विशाल परब यांना पाठिंबा
ओटवणे प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याची विशाल परब यांच्याकडून ग्वाही
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी जि.प.शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांची माहिती
एक झाड तोडल्यास अन्यायकारक पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे या शासन निर्णयाचा परिणाम शेतकरी वर्गात दिसू लागला आहे व याबाबत कॅबिनेट मंत्री पदी असूनही या निर्णयाला दीपक केसरकर यांनी विरोध न केल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.ज्या शेतकरी वर्गाने तीन वेळा आमदार बनवून कॅबिनेट पदापर्यंत पोहोचवले त्या शेतकऱ्यांचाच विसर पडल्याने येत्या निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदार बदलण्याची वेळ आली आहे असे शेतकरी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. "आपल्या मागण्यांची दखल घेणारा,शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारा व शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत उठवणारा प्रतिनिधी आपणाला हवा आहे.शेतकऱ्यांचे भले करणे दूरच पण जे हक्काचे आहे ते काढून घेतले जात असताना शांत बसणारा आमदार नको" असा सूर असंख्य शेतकऱ्यांच्या वतीने उमटत आहे.विशाल परब यांनी तत्परतेने शेतकऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिल्यानंतर असंख्य शेतकऱ्यांनी विशाल परब याना पाठिंबा जाहीर केला.शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत मुंबईतील नामांकित सहा वकिलांशी विशाल परब यांनी चर्चा सुरू केली आहे,लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या अन्यायकारक शासन निर्णयाचा परिणाम या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या असंख्य लोकांवर होणार आहे.लाकूड व्यावसायिक,टेम्पो चालक,मजुरी करणारे,हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे, सुतार,लाकडी वस्तू विकणारे स्थानिक, इ.सर्वानाच याचा फटका बसला बसणार आहे. त्यामुळे हा शासननिर्णय रद्द करण्यात यावा ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.
शेतकऱ्यांचे इतरही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.सासोली जमीन, वेळागर, आजगाव, भोम,धाकोरे,सोनसुरे,आसोली,सागरतीर्थ, नानोस, मळेवाड,आरोस, व इतर गावात मायनिंग चे संकट घोंगावत आहे वेळागरयेथील शेतकऱ्यांचा जमिनीचा प्रश्न,युवावर्ग नोकरी धंद्यासाठी दिवसाला 100 ते 150 किलोमीटर रोज प्रवास करून आपला जीव धोक्यात घालून नोकरीधंद्यानिमित्त गोवा राज्यात जात असतात, कारण आपल्या मतदारसंघात कोणतीही मोठी कंपनी अथवा इंडस्ट्री नाही.आरोग्य क्षेत्रात देखील अनेक प्रश्न कायम आहेत.आज सावंतवाडी ला आलेले 99 टक्के पेशंट बांबुळीला पाठवले जातात, कारण आपल्या इथे कुठलीही मशिनरी उपलब्ध नाही व वाटेत जातानाच अनेकजण मृत होतात यामुळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल,जिथे आधीच सरकारी हॉस्पिटल आहेत तिथे व्यवस्थेचे बळकटीकरण,तिन्ही तालुक्यात सुदृढ आरोग्य यंत्रणा स्थापित करणे तसेच दोडामार्ग तालुक्यात विशाल परब यांनी गोशाळा स्थापन केली आहे,जिथे म्हातारी जनावरे शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन घेऊन जातील व त्यांचे योग्य संगोपन केले जाईल. शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपये झाला याचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबाना बसला आहे.सावंतवाडी बस स्थानकाचीही दुर्दशा झाली आहे. इत्यादी अनेकविध प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही विशाल परब यांनी दिली त्यामुळे विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल परब याना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.तरी गॅस शेगडी या चिन्हावर मतदान करून विशाल परब याना निवडुन देण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष व माजी जि.प.शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले आहे