For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलग्यातील गवळी बांधवांकडून म्हशी पळवण्याचा थरार रंगतदार

10:51 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिंडलग्यातील गवळी बांधवांकडून म्हशी पळवण्याचा थरार रंगतदार
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा 

Advertisement

दीपावली हा सण खास गवळी बांधवांचा समजला जातो. या दिनी खास गवळी बांधव आपल्या जनावरांना स्वच्छ करून, रंगरंगोटी करतात. तसेच शिंगाणा रंग, रंगीत रिबन, घुंगरूंची माळ, मोर पिसे, कवडीच्या माळा, पितळी साखळ्या घालून अत्यंत आकर्षकपणे अलंकृत बनवतात. याच पद्धतीने येथील गवळी बांधवांनी आपल्या म्हशींना सजवून सकाळपासूनच उत्सवाला सुरुवात केली होती. या उत्सवात गावातील सर्व गवळी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील लक्ष्मी गल्ली, मरगाई गल्ली, महादेव गल्ली, रामदेव गल्ली, नवीन वसाहत, मांजरेकर नगर अशा विविध भागातून सजवलेल्या म्हशी घेऊन मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीत बालगोपाळपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी गळ्यात भगवी शाल, भगवे फेटे, पांढरा पोशाख परिधान केला होता.

यावेळी गावात ठिकठिकाणी सुहासिनी महिलांनी आरती ओवाळून पूजन केले. काही गवळ्यानी आपल्या मोटरसायकलचे सायलेन्सर काढून मोटरसायकल बरोबरच म्हशींना पळविण्याचा थरार मोठ्या जल्लोषात  प्रदर्शित केला. मिरवणुकीच्या अग्रभागी फटाक्यांची आतषबाजी व पारंपारिक वाद्य असल्यामुळे मिरवणुकीला रंगत आली. दुपारी बारा वाजल्यापासून चालू झालेली ही मिरवणूक रात्री अकरापर्यंत चालूच होती. त्यामुळे गावातील जनतेला देखील हा थरार उत्सुकतेने पाहण्याची संधी प्राप्त झाली. मिरवणुकीचे नेतृत्व सागर मनोळकर, कुमार उसुलकर यांनी केले. गल्लीतील चौकातून म्हशींना विशिष्ट आवाजाच्या तालावर नाचविले जात होते. यामुळे पाळीव जनावरांची नम्रता जनतेला दिसून येत होती. हा सण गावात कित्येक वर्षापासून उत्साहात साजरा केला जातो. शेकडो म्हशी सजविलेल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.