For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसरा ध्रूव वेगाने वितळतोय

06:21 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
तिसरा ध्रूव वेगाने वितळतोय
Advertisement

भारत, चीन, पाकिस्तान, नेपाळला धोका

Advertisement

हिमालयाला जगाचा तिसरा ध्रूव म्हटले जाते. हिमालयात तिबेटचे पठार, हिंदुकुश, तियानशान पर्वतरांगेचा समावेश होतो. हवामान बदल, वाढते तापमान आणि पावसाच्या बदललेल्या पॅटर्नमुळे मागील तीन वर्षांमध्ये हिमालयातील 10 हजार ग्लेशियर्स वितळले आहेत. या ग्लेशियर्स वितळल्याने हजारोंच्या संख्येत ग्लेशियल लेक्स तयार झाले असून ते हिमालयाच्या सखल भागांसाठी धोकादायक आहेत. हे कुठल्याही क्षणी तुटून सिक्कीम, केदारनाथ किंवा चमोली सारखी आपत्ती निर्माण करू शकतात. दिसण्यास अत्यंत सुंदर हे ग्लेशियल लेक्स तुटल्यावर भयंकर संकट घेऊन येतात. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस इन्स्टीट्यूट ऑफ तिबेटीयन प्लेट्यू रिसर्चचे वैज्ञानिक वीकाई वांग आणि त्यांच्या पथकाने हिमालयाच्या ग्लेशियल लेक्सवर अध्ययन केले आहे. हे अध्ययन अलिकडेच नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. भारत, चीन, पाकिस्तान, नेपाळ या देशांनी त्वरित या धोकादायक सरोवरांबद्दल पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे.

 

भारत-चीन-पाकला एकत्र यावे लागणार

Advertisement

तिसऱ्या ध्रूवात निर्माण झालेल्या या सैतानांपासून वाचण्यासाठी या सर्व देशांना एकत्रितपणे काम करावे लागणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. वांग यांनी सेंटीनल-2ए आणि 2बीचा डाटा मिळविला असून तो 2018-22 दरम्यानचा आहे. त्यांनी सर्व ग्लेशियल लेक्सचे वर्गीकरण केले आहे, त्यांचा आकार, स्रोत आणि धोक्याच्या आधारावर त्यांचे वर्गीकरण करत त्यांना विविध यादींमध्ये समाविष्ट करण्यात आले.

आपत्तींची संख्या दुप्पट

या अध्ययनातून भीतीदायक आकडेवारी समोर आली आहे. 1981-90 दरम्यान हिमालयावर जीएलओएफच्या 1.5 घटना घडायच्या. 2011-2020 दरम्यान हा आकडा वाढून 2.7 झाला आहे. म्हणजेच प्रत्येक दशकात हे प्रमाण दुप्पट वेगाने वाढत आहे. हा प्रकार हिमालय आणि त्याच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक संकेत आहे. जर दरवर्षी जीएलओफच्या घटना घडत राहिल्यास जागरुक होण्याची वेळ आल्याचे मानावे लागेल.

5535 सरोवरं धोकादायक

वांग यांच्या टीमने संबंधित देशांसाठी धोकादायक ठरणाऱ्या 5535 सरोवरांची ओळख पटविली आहे. ही सरोवरं कधीही फुटू शकतात. यातील 1500 सरोवर अत्यंत धोकादायक आहेत. यांच्या हाय पोटेन्शियल जीएलओएफची शक्यता आहे. म्हणजेच सखल भागांमध्ये प्रचंड हानीचे संकट कधीही ओढवू शकते.

55 हजार इमारती धोक्यात

या सरोवरांच्या फुटण्यामुळे किमान 55,805 इमारती, 105 जलविद्युत प्रकल्प, 194 चौरस किलोमीटरमधील शेती, 50,005 किलोमीटर लांबीचे रस्ते, 4038 ब्dिराज नष्ट होण्याची भीत आहे. याचबरोबर या सरोवरांमुळे किमान 2 लाख लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असे वांग यांनी म्हटले आहे.

कशी घडते आपत्ती?

ग्लेशियल लेक्स तुटण्याच्या घटनेला जीएलओएफ- ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स म्हटले जाते. ग्लेशियर वितळल्याने तयार झालेले हे सरोवर ग्लेशियर तुटल्याने तुटू शकतात. हिमस्खलन, भूस्खलन किंवा नैसर्गिक बांध तुटल्याने ही दुर्घटना घडू शकते. मग यातील लाखो लिटर पाणी वेगाने खालच्या बाजूने वाहून जात मोठी हानी घडू शकते.

Advertisement
Tags :

.