For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime : 73 वर्षीय वृद्धेच्या बोरमाळ हिसकावणाऱ्या चोरट्याला 12 तासांत केले जेरबंद

03:41 PM Nov 25, 2025 IST | NEETA POTDAR
satara crime   73 वर्षीय वृद्धेच्या बोरमाळ हिसकावणाऱ्या चोरट्याला 12 तासांत केले जेरबंद
Advertisement

                              औंध पोलीस ठाण्याने अवघ्या १२ तासांत अट्टल चोर केला जेरबंद 

Advertisement

औंध : कळंबी (ता. खटाव) येथील वृद्धेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणाऱ्या अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या १२ तासात जेरबंद केले. कळंबी ते औंध रस्त्यावरून शेतातून घरी जाताना काळया दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी कळंबी येथील सिंधू बाळासो देशमुख (वय ७३) यांच्या गळ्यातील सुमारे एक लाखाची बोरमाळ हिसकावून नेली होती. याची तक्रार सिंधू देशमुख यांनी औंध पोलीस ठाण्याला दिली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीसनिरीक्षक गणेश वाघमोडे यांनी तपासास सुरूवात केली. १२ तासात एका आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले. यामध्ये सुधीर उर्फ सुधाकर अशोक मोहिते (रा. कोतीज ता. कडेगांव जि. सांगली) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता प्रकाश श्रीरंग जाधव (ता. माधळमुठी ता. खानापूर) या अट्टल संशयिताचे नाव निष्पन्न झाले आहे. मात्र अद्यापही तो फरार आहे.

Advertisement

सांगली जिल्ह्यातील कडेगाव, विटा, इस्लामपूर, कोकरूड, आटपाडी, तासगाव पोलीस ठाण्यामध्ये दोघांवरघरफोडी आणि जबरी चोरीचे ९ गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्यांकडून चोरीतील मुद्देमालही जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, रणजित सावंत यांनी औंधचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, उपनिरीक्षक अनिल शिरोळे, सतीश मयेकर, चेतन सानप, दादासो देवकुळे, सुनिल गोडसे, सुखदेव बुधे, नाना कांबळे, रुपाली क्षीरसागर, यशोदा मोरे, पो. कॉ. सचिन राऊत, मोहन कदम, रोहित खरात, ज्ञानेश्वर टिंगरे, स्वराज शिंदे, प्रमोद इंगळे, साहिल झारी, सनी लवंगारे, राहुल जाधव, मेघा फडतरे, कोमल पवार, दिपा जाधव, सुमाली मोरे यांच्या पथकाचे अभिनंदन केले.

Advertisement
Tags :

.