महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रधान, वैष्णव, यादवांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपणार

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता : नारायण राणेंचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

देशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे, भाजपने सलग दोनवेळा राज्यसभेवर पाठविलेल्या दिग्गज नेत्यांबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्यासवेमत केंद्रातील अनेक वरिष्ठ मंत्र्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होणर आहे. यात भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंह पुरी, नारायण राणे, पुरुषोत्तम रुपाला यासारख्या मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, व्ही. मुरलीधरन आणि एल. मुरुगन यांचा कार्यकाळही समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल हे तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. भूपेंद्र यादव, प्रधान, रुपाला, मांडविया आणि न•ा हे दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार झाले आहेत. राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण झाल्यावर भाजप या मातब्बर नेत्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यसभा खासदारांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट महिन्यात झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले होते.

धर्मेंद्र प्रधान हे ओडिशामधून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अश्विनी वैष्णव हे मूळचे राजस्थानचे असले तरीही त्यांचे कार्यक्षेत्र ओडिशा राहिले आहे. अश्विनी वैष्णव हे ओडिशातील बालासोर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. भूपेंद्र यादव हे हरियाणातून निवडणूक लढवू शकतात. एल. मुरुगन यांना भाजपकडून तामिळनाडूतील एखाद्या मतदारसंघाची उमेदवारी दिली जाऊ शकते. व्ही. मुरलीधरन हे केरळमधील एखाद्या मतदारसंघात भाजपच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याचे मानले जातेय. तर राजीव चंद्रशेखर देखील कर्नाटक किंवा केरळमधून निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. निर्मला सीतारामन आणि पियूष गोयल हे महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयोग यशस्वी ठरला होता. भाजपने 21 खासदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती, यातील 12 खासदार हे आमदार म्हणून निवडून आले होते. यातील 20 खासदार हे लोकसभेतील होते. या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात राज्यसभेतील काही खासदारांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

एप्रिलमध्ये पूर्ण होणार कार्यकाळ

अनिल अग्रवाल, अनिल बलूनी, अशोक वाजपेयी, अनिल जैन, प्रकाश जावडेकर, कांता कर्दम, सुशील मोदी, समीर ओरांव, सकलदीप राजभर, जीव्हीएल नरसिंह राव, अजय प्रताप सिंह, कैलास सोनी, विजयपाल सिंह तोमर, डी.पी. वत्स आणि हरनाथ सिंह यादव यांचा कार्यकाळही एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. यातील अनेक जणांना नव्या समीकरणांमुळे पुन्हा राज्यसभेवर निवडून आणणे अवघड आहे. नव्या समीकरणानुसार काँग्रेसला हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेचा लाभ होणार आहे. तर भाजप मध्यप्रदेश आणि राजस्थानातील स्वत:च्या सर्व 7 जागा आणि काँग्रेस या दोन्ही राज्यांमधील प्रत्येकी एक जागा कायम राखणार आहे. काँग्रेसला तेलंगणात राज्यसभेच्या जागांचा लाभ होणार आहे. तर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील 4 जागा राखू शकणार आहे. भाजपला पश्चिम बंगालमध्ये एक जागा मिळणार आहे. तर दिल्लीतील तिन्ही राज्यसभा जागा पुन्हा आम आदमी पक्षाला प्राप्त होतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article