For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा गाव विकासासाठी ग्रामपंचायत व देवस्थान यापुढे समन्वय साधणार

04:11 PM Nov 20, 2023 IST | अनुजा कुडतरकर
आचरा गाव विकासासाठी ग्रामपंचायत व देवस्थान यापुढे समन्वय साधणार
Advertisement

गाव विकासाच्या कार्यासाठी देवस्थान जमीन उपलब्ध करून देणार

Advertisement

रामेश्वर देवस्थान समितीतर्फे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सन्मान

आचरा | प्रतिनिधी
रामेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये गेली काही वर्ष समन्वय नसल्याने आचरा गाव विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र यापुढे देवस्थान समिती व आचरा ग्रामपंचायत विकासाच्या मुद्यावर एकत्रित काम करणार असल्याने खरया अर्थाने आचरा गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आचरा नवनिर्वाचित सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी देवस्थान समिती ने आयोजित केलेल्या सत्कारा वेळी व्यक्त केला. यापुढे ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती एकविचाराने काम करणार असल्याने फर्नांडिस यांनी सांगत आचरा गावचा जमिनप्रश्न देवस्थानने तातडीने निकाली काढून ग्रामस्थांना आश्वासित करण्याची विनंती देवस्थान समितीला यावेळी केली. आचरा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा देवस्थान समिती तर्फे रामेश्वर भक्त निवास येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

Advertisement

गाव विकासाच्या कार्यासाठी देवस्थान जमीन उपलब्ध करून देणार

यावेळी बोलताना सरपंच फर्नांडिस म्हणाले की आचरा ग्रामसचिवालय, आचरा ग्रामिण आरोग्य केंद्र, निवारा शेड, डंपिंग ग्राउंड आदी साठी लागणारी जमीन देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन देणार असल्याचे हमी दिली आहे. तसेच यापुढे गाव विकासाला लागणारे सहकार्य देण्याची ग्वाहीही देवस्थान समिती कडून देण्यात आलेली असल्याचे फर्नांडिस यांनी सांगिलते

यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी ,सचिव अशोक पाडावे, रविंद्र गुरव, अभय भोसले, डॉ प्रमोद कोळंबकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच जेरॉन फर्नांडिस ग्रामपंचायत सदस्य संतोष मिराशी, मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, सारिका तांडेल, योगेश गावकर, सायली सारंग, चंद्रकांत कदम, हर्षदा पुजारे, अनुष्का गावकर, पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अशोक पाडावे यांनी मानले.

Advertisement
Tags :

.