For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन मजली इमारत कोसळून मेरठमध्ये 10 जणांचा मृत्यू

06:46 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
तीन मजली इमारत कोसळून मेरठमध्ये 10 जणांचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ मेरठ

Advertisement

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये इमारत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मेरठमधील झाकीर कॉलनी भागातील गल्ली क्रमांक 6 जवळ तीन मजली इमारत कोसळल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. ढिगाऱ्याखाली दबून 10 जणांचा मृत्यू झाला असून आणखी अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्मयता आहे. अग्निशमन विभाग आणि इतर विभाग मदतकार्यात गुंतले आहेत. अंधार आणि हलका पाऊस यामुळे बचाव आणि मदतकार्यात अडचणी येत होत्या. तसेच गल्लीतील लहान रस्त्यांमुळे मोठमोठी मशिन घटनास्थळापर्यंत पोहोचू न शकल्याने मदतकार्याला म्हणावी तशी गती येऊ शकली नाही.

मेरठचे डीएम दीपक मीणा यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या हवाल्याने सांगितले. सर्व 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. परिसर सील करण्यात आला असून ढिगारा हटवण्यात येत आहे. मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना माहिती देण्यात आली आहे. अमरोहा आणि सहारनपूर येथून एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री स्वत: या दुर्घटनेवर लक्ष ठेवून आहेत. नाफो अलाउद्दीन असे कोसळलेल्या इमारतीच्या मालकाचे नाव आहे. या घराखाली डेअरी चालत होती, असे सांगण्यात आले.

Advertisement

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेरठ जिह्यातील लोहियानगर येथे इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेची दखल घेतली असून जखमींना तातडीने ऊग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement
Tags :

.