For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल

06:21 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

आयपीएल चॅम्पियन बनणाऱ्या संघाला विजेतेपदासह मोठी रक्कम मिळणार आहे. तसेच चॅम्पियन संघाव्यतिरिक्त, उपविजेता, प्लेऑफमधील इतर दोन संघ व ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेते यांच्यावरही बक्षीसांचा वर्षाव केला जाईल.

आयपीएल 2024 च्या विजेत्या संघाला ट्रॉफी व्यतिरिक्त 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतील. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला 7 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला 6.5 कोटी रुपये दिले जातील. याशिवाय, स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅपसह 15 लाख रुपये दिले जातील. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपसह 15 लाख रुपये मिळतील. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली 714 धावांसह आघाडीवर आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल 24 विकेट्ससह प्रथम क्रमांकावर आहे. याशिवाय, अन्य काही बक्षीसे देखील यावेळी देण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.