For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पैलवानांनी विद्यापीठाचे नाव जागात सुवर्णाक्षरांनी कोरावे; हिंद केसरी दिनानाथ सिंह यांचे आवाहन

03:14 PM Jun 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
पैलवानांनी विद्यापीठाचे नाव जागात सुवर्णाक्षरांनी कोरावे  हिंद केसरी दिनानाथ सिंह यांचे आवाहन
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कुस्तीच्या पंढरीत शिवाजी विद्यापीठाने मॅट संकुल उभारून पैलवानांना प्रोत्साहन दिले आहे. आई-वडीलांची पुण्याई व कष्टाने कोल्हापुरच्या पैलवानांनी महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीपर्यंत मजल मारली आहे. कुस्ती प्रशिक्षकांनी पैलवानांमधील गुण ओळखून त्यांना मॅटवरील कुस्तीत तरबेज करावे. विद्यापीठाने संकुलासह सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे पैलवानांनी शिवाजी विद्यापीठाचे नाव जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णाक्षरांनी कोरावे, असे आवाहन हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी पैलवानांना केले.

Advertisement

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तरी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील ‘कुस्ती संकुलाचे’ उद्घाटन हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

हिंदकेसरी दिनानाथ सिंह म्हणाले, विद्यापीठाने दिलेल्या सुविधांचा उपयोग करून कुस्तीतील उस्तादांनी पैलवान घडवावे. जेणेकरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कुस्ती पंढरीचे नाव देश-विदेशात चमकेल. देशभरात राजर्षी विश्वमित्रा, राजर्षी जनक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे तीनच राजर्षी होवून गेले. माझा जन्म उत्तरप्रदेशमध्ये झाला असला तरी कर्मभुमी कोल्हापूर आहे. त्यामुळे माझा मृत्यू आणि अंतसंस्कार कोल्हापुरात व्हावे, अशी अपेक्षाही हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी व्यक्त केली. महाष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर म्हणाले, बऱ्याच वर्षांनी मॅट कुस्तीसंकुलाची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. व्ही. टी. भोसले कात्याचे मॅट व वर ताडपत्रीवर आमची प्रॅक्टीस घ्यायचे. आता पैलवानांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. तरी वस्तादांनी हिरे शोधून त्यांच्यातील कौशल्य ओळखून प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर रोषण होईल. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, 1897 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीचे राजर्षी शाहू खासबाग मैदान सुरू केले. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशवरून पैलवान आणले. या पैलवानांनी कोल्हापुरच्या पैलवानांचा केलेला पराभव शाहूंच्या जिव्हारी लागला. त्यांनी त्या पैलवानांना येथेच ठेवून घेत त्यांच्याकडून कोल्हापुरच्या पैलवानांना प्रशिक्षण दिले. आणि भारतभरातील सर्वश्रेष्ठ पैलवान कोल्हापुरचाच असला पाहिजे, हे शाहूंचे स्वप्न पूर्ण झाले. कुस्तीसंकुलामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे पैलवानांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती क्षेत्रात सुवर्ण कामगिरी करावी.

Advertisement

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मॅटवरील कुस्ती संकुलाचा वापर करून येथील 10 वर्षापुढील पैलवानांना हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा तज्ञांकडून प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या तालमीत घडलेल्या पैलवानांनी देश-विदेशात विद्यापीठासह कोल्हापुरच्या नावाचा डंका पिटावा, अशी अपेक्षाही डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक शारीरिक व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी केले. आभार डॉ. पी. टी. गायकवाड यांनी मानले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, हिंदकेसरी विनोद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील, भालचंद्र सारंग, विनोद चौगले, संभाजी वरूटे, रणजित नलवडे, नंदिनी साळोखे, वैष्णवी कुशाप्पा, रेश्मा माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, क्रीडा प्रशिक्षक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.