महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्याध्यापिकेकडून शिक्षिकेला मारहाण

11:49 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नामोशी गिरी सरकारी प्राथमिक शाळेतील घटना

Advertisement

म्हापसा : नामोशी गिरी येथील सरकारी प्राथमिक शाळेत दोन महिला शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याने शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरोधात म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापिकेकडून गेल्या दीड वर्षापासून सतावणुकीचा प्रयत्न सुरू असून शिक्षकांना भर शाळेत मारहाण करणाऱ्या या मुख्याध्यापिकेला सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. मुख्याध्यापिकेची यापूर्वी 13 वेळा इतरत्र बदली करण्यात आली असून सर्वत्र हाच सतावणुकीचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती म्हापसा पोलिसांनी दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवरही राजकीय दडपण असल्याची माहिती हाती आली आहे.

Advertisement

शिक्षिका प्रार्थना दीपक नाईक म्हणाल्या की, मुख्याध्यापिका रोशनी साखळकर यांनी आपल्या हातावर प्रहार केल्याने पाठीमागून हात सुटला असून डॉक्टरांनी एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आपण सकाळी पावणेआठ वाजता दररोज शाळेत पोचते, मात्र मुख्याध्यापिका साखळकर उशिरा येते. दुपारी 1.20 पर्यंत काम संपवून शिक्षक सही करण्यास गेल्यास दरवाजाला कुलूप लावून मुख्याध्यापिका बाहेर शेतीत जाऊन थांबते. याबाबत आपण जाब विचारला असता आपल्यास ढकलले. आतमध्ये येऊन मोबाईल फोडण्याची धमकी देत आपला हात पिरगळला. नंत आपण पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आपल्यास पोलीस स्थानकात नेले. नंतर मेडिकल केले असता डॉक्टरांनी आपला हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. याबाबत आपण एडिआयशी संपर्क साधला असता त्यांनी दखल घेतली, मात्र आपल्यास न्याय मिळाला नाही. तुम्ही आपल्याकडे थेट कसे आलात, योग्यरित्या यावे असे सांगून आपल्यास मेमो दिल्याचे प्रार्थना नाईक म्हणाल्या.

शिक्षिका तेजस्वी पोकळे अधिक माहिती देताना म्हणाल्या की, आपण 13 वर्षे शिक्षिका म्हणून काम पाहत आहे. ही मुख्याध्यापिका ज्या दिवशी आली त्या दिवसापासून त्यांनी आमची सतावणूक सूरू केली आहे. कुठेही चला, मंत्र्याकडे चला, न्यायालयात चला आपले कुणीही काहीच करणार नाही. काल बुधवारी आम्ही घरी जाताना मस्टरवर सही करायला गेल्यास दार बंद करुन बाजूला शेतात गेल्या होत्या. काहीवेळा विद्यार्थी टॉयलेटमध्ये गेल्यास दार बंद करते. ‘अभी टॉयलेट मे नही जाने का’ असे बजावते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article