For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात उंच बैल

06:57 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात उंच बैल
Advertisement

उंचीच्या बळावर नोंदविला विश्वविक्रम

Advertisement

अमेरिकेतील एक बैल सध्या स्वत:च्या उंचीमुळे चर्चेत आला आहे. रोमियो नावाचा हा बैल जगातील सर्वात उंच बैल ठरला आहे. आता त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाले आहे. अमेरिकेच्या ऑरिगॉनमध्ये रोमियो नावाचा बैल असून तो तुमच्यासमोर उभा राहिला तर तुम्ही निश्चितपणे घाबरून जाल.

Advertisement

रोमियो या बैलाची उंची 194 सेंटीमीटर म्हणजेच 6 फूट 4.5 इंच आहे. 17 डिसेंबर 2023 रोजी त्याला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. रोमियो हा 6 वर्षांचा असून वेलकम होम अॅनिमल सँक्चुरीमध्ये तो स्वत:ची मालकीण मिस्टी मोर यांच्यासोबत राहतो.

रोमियो अत्यंत शांत असून तो कुणालाच त्रास देत नसल्याचे मिस्टी सांगतात. मिस्टी यांनी रोमियोला एका डेअरी फार्ममधून वाचविले होते. डेअरी इंडस्ट्रीत बैलांना केवळ बाय-प्रॉडक्टच मानले जाते. त्यंना केवळ नफा कमाविण्याचे माध्यम समजले जाते. याचमुळे मिस्टी यांनी रोमियोला स्वत:जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

रोमियो हा माणूस आणि प्राण्यांदरम्यान किती चांगले संबंध असू शकतात याचा पुरावा असल्याचे मिस्टी यांचे सांगणे आहे. रोमियोला विश्वविक्रमामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाल्याने लोक त्याला पाहण्यासाठी दूरदूरवरून येत आहेत. तर मिस्टी यांना रोमियोच्या विश्वविक्रमाचे कौतुक वाटत आहे.

Advertisement
Tags :

.