महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जायंट्स परिवार-प्राईड सहेलीचे अधिकारग्रहण

10:23 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जायंट्स परिवार व प्राईड सहेलीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. जायंट्स डेप्युटी वर्ल्ड चेअरमन दिनकर अमिन, सेंट्रल कमिटी सदस्य लगमाण्णा दोडमनी यावेळी उपस्थित होते. व्यासपीठावर श्रीधन मलिक, नितीन पै, विश्वजीत उपाध्याय, मनीषा बेनके, अऊण पाटील, परिवार व प्राईड सहेलीच्या माजी अध्यक्षा आरती शहा व किरण वेसणे, नूतन अध्यक्षा मोनाली शहा व विजय खोत उपस्थित होते. प्रथम आरती शहा यांच्या हस्ते जायंट्सचा दीप प्रज्वलित करून जायंट्स प्रार्थना झाली. आरती शहा यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख करून त्यांचा सत्कार करण्यात आला. नवीन सदस्य, पदाधिकारी यांना युनिट डायरेक्टर अऊण पाटील यांनी शपथ दिली. नूतन अध्यक्ष मोनाली शहा व विजय खोत यांना वर्ल्ड चेअरमन लक्ष्मण यांनी अधिकार ग्रहणाची शपथ दिली. अंध विद्यार्थिनी सोनिया नारळेकर हिने एसएसएलसीला 91 टक्के तर पीयूसीला 89 टक्के गुण कुणाच्याही मदतीविना घेतले,  त्याबद्दल व एकल पालक सलमा यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रश्मी कदम यांनी केले. आभार जिग्ना शहा यांनी मानले. कार्यक्रमाला राजू माळवदे, प्रवीण त्रिवेदी, गंगाधर एम., प्रदीप हिरेमठ, दीपक हावळ, सचिन केळकर, विनोद खोत, ज्योती, निऊपमा, स्नेहल, खुशी, अऊणा शहा, नीता बिडकर, इतर परिवार व प्राईडचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article