कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अधिक सक्रीय झाला आहे सूर्य

07:00 AM Oct 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नासाच्या वैज्ञानिकांचा खुलासा

Advertisement

सूर्य जो रोज आम्हाला स्थिर आणि शांत दिसतो, प्रत्यक्षात तो अत्यंत उलथापालथीने भरलेला आहे. दर 11 वर्षांमध्ये सूर्याचे एक चक्र (सोलर सायकल) होते, ज्यात त्याच्या हालचाली वाढतात किंवा घटतात. नासा आणि एनओएएने वर्तमान 25 वे सोलर सायकर (2020-31) कमकुवत असेल असा अनुमान 2019 मध्ये व्यक्त केला हेता, परंतु हा अपेक्षेपेक्षा अधिक सक्रीय निघाला. सूर्याच्या हालचाली 2008 पासून हळूहळू वाढत असून हे 11 वर्षांच्या चक्राबाहेर जात असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement

सूर्य दर 11 वर्षांमध्ये एक चक्रातून जातो, ज्याला सोलर सायकल म्हटले जाते. यात सूर्याच्या हालचाली प्रथम वाढतात (सोलर मॅक्सिमम) आणि मग कमी होतात (सोलर मिनिमम). यादरम्यान सूर्यावर डाग (सनस्पॉट्स), सौरज्वाला (सोलर फ्लेयर्स) आणि कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) यासारख्या घटना वाढतात. सोलर मॅक्सिमममध्ये सूर्याचे चुंबकीय ध्रूव परस्परांमध्ये बदलले जातात. वैज्ञानिक 25 सोलर सायकल्पासून (सुमारे 275 वर्षे) याचे अध्ययन करत आहेत, ज्यात सनस्पॉट्स मोजणीचा मुख्य आधार आहे. सनस्पॉट्स सूर्याच्या पृष्ठभागावर काळे डाग असतात, जे त्याची हालचाल दर्शवितात, अधिक सनस्पॉट्सचा अर्थ सूर्य अधिक सक्रीय आहे.

नासाची चुकीची भविष्यवाणी

2019 मध्ये सोलर सायकल 24 संपल्यावर नासा आणि एनओएएने सोलर सायकल 25 (2020-31) कमकुवत असेल अशी भविष्यवाणी केली होती. सायकल 24 (2008-19) अत्यंत कमकुवत होते, ज्यात सनस्पॉट्स आणि सौरज्वाला कमी होत्या, परंतु सायकल 25 मध्ये सूर्याच्या हालचाली सरासरीपेक्षा अधिक निघाल्या, जे वैज्ञानिकांसाठी आश्चर्यकारक आहे. सर्व संकेत सूर्य कमी हालचालींच्या दीर्घकाळात जात असल्याचे सांगत होते, परंतु उलटेच घडले आहे, सूर्य हळूहळू आणखी सक्रीय होतोय असे नासाच्या जेट प्रोपल्शन लेबोरटरीचे प्लाज्मा भौतिकशास्त्रज्ञ जेमी जसिंस्की यांनी सांगितले.

हालचाली का वाढत आहेत?

जसिंस्की आणि त्यांचे सहकारी मार्को वेरी यांनी सूर्याच्या डाटाचे विश्लेषण केले आणि 2008 पासून सूर्याच्या सौरहवेची शक्ती वाढत असल्याचे त्यांना आढळून आले. सौरहवा ही सूर्यातून निघणारी चार्ज्ड कणांचा प्रवाह असू ज्याची शक्ती वेग, घनत्व, तापमान, दबाव आणि चुंबकीय क्षेत्राद्वारे मापली जाते. या सर्व गोष्टी 2008 पासून वाढत आहेत. असे का घडतेय हे वैज्ञानिकांनाही माहित नाही. सूर्याच्या आत जटिल प्रक्रिया याच कारण असू शकते, जे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. पूर्वीच्या नोंदीतही सूर्याने अनपेक्षित वर्तन दाखविले आहे. उदाहरणार्थ...

मॉन्डर मिनिमम (1645-1715) : 70 वर्षांपर्यंत सूर्यावर जवळपास कुठलाच सनस्पॉट्स दिला नाही.

डाल्टन मिनिमम (1970-1830) : 40 वर्षांपर्यंत हालचाली कमी राहिल्या.

1790 मध्ये सूर्य 40 वर्षांपर्यंत कमी सक्रीय का राहिला हे आम्हाला ठाऊक नाही. दीर्घकाळाच्या कलाची भविष्यवाणी करणे अवघड असल्याचे जसिंस्की यांचे सांगणे आहे.

वाढत्या हालचालींचे प्रभाव

सूर्याच्या वाढत्या हालचली  अंतराळ हवामानाल प्रभावित करू शकतात. याचे प्रभाव.... सौर वादळ (सोलर स्ट्रॉर्म) : सौरज्वाला आणि सीएमई पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला प्रभावित करू शकतात, ज्यात वीज ग्रिड, सॅटेलाइट्स आणि संचार सिस्टीमध्ये बिघाड होऊ शकतो.

नॉर्दन लाइट्स : सौर हवेमुळे उत्तर आणि दक्षिण ध्रूवांवर औरोरा अधिक दिसून येऊ शकतो.

अंतराळमोहीम : सौरहालचाली अंतराळवीर आणि उपग्रहांसाठीचा धोका वाढवू शकतात.

परंतु 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या तुलनेत सौर हवा अद्याप कमकुवत आहेत, आम्हाला आणखी डाटा मिळवावा लागेल, असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

सनस्पॉट्सच्या सीमा

वैज्ञानिकांनी पूर्वी सनस्पॉट्सना सूर्याच्या हालचालींचे मुख्य संकेत मानले होते. परंतु सनस्पॉट्स पूर्ण चित्र दाखवत नसल्याचे अध्ययनातून समोर आले. सौरहवा, चुंबकीय क्षेत्र आणि अन्य घटकांचे अध्ययन आवश्यक आहे. सूर्य जटिल असून त्याची भविष्यवाणी करणे अवघड आहे.

सोलर सायकल 24 अन् 25 ची तुलना

सायकल 22 आणि 23 (1986-2008) -हे सरासरी चक्र होते, परंतु सौरहवेचा दबाव कमी होत गेला. वैज्ञानिकांना सूर्य पुन्हा मॉन्डर किंवा डाल्टन सारख्या कमी सक्रीय काळात जात असल्याचे वाटले.

सायकल 24 (2008-19) : हा सर्वात कमकुवत सायकल्सपैकी एक होता, सनस्पॉट्स आणि ज्वाला अत्यंत कमी होत्या.

सायकल 25 (2020-31) : हे सरासरी सायकलप्रमाणे सक्रीय आहे, परंतु सौरहवेची शक्ती सातत्याने वाढत आहे.

हेल सायकल : सूर्याचे खरे चक्र

वैज्ञानिकांना सूर्याचे खरे चक्र 22 वर्षांचे असू शकते असे आढळून आले. ज्याला हेल सायकल म्हटले जाते. यात दोन सोलर सायकल (11 अधिक 11) मिळून एक पूर्ण चक्र तयार होते. तेव्हा सूर्याचे चुंबकीय ध्रूव स्वत:च्या मूळ स्थितीत परत येतात. हेल सायकल सूर्याच्या हालचाली समजून घेण्याचा मुख्य आधार असू शकतो असे जसिंस्की आणि वेरी यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article