कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहर समितीच्या विस्ताराने लढ्याला बळकटी

06:22 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आता आंदोलनाची दिशा ठरवा, कार्यकर्त्यांमधून सूर

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

निवडणुका आल्या तरच महाराष्ट्र एकीकरण समिती कामाला लागते, असा शिक्का आजवर मारला जात होता. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असून यामध्ये प्रत्येक प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश केला जातो. हे नुकत्याच झालेल्या शहर समितीच्या विस्तारावरून दिसून येत आहे. शहर समितीच्या विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार असून नवीन युवा कार्यकर्ते लढ्यासोबत जोडले जात आहेत. त्यामुळे आता आंदोलनाची दिशा ठरवा, असा सूर शनिवारी आयोजित शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. रमेश पावले यांनी कार्यकारिणीला शुभेच्छा देत येत्या गुढीपाडव्याला प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर गुढी उभारून समितीला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन केले. मराठी भाषा, संस्कृती टिकावी यासाठी तरुणांची एक फौज तयार करावी, अशी मागणी सतीश पाटील यांनी केली. मनोहर हलगेकर म्हणाले, युवा कार्यकर्त्यांचे चुकत असेल तर ज्येष्ठांनी त्यांना ती चूक दाखवून द्यावी. परंतु, एकत्रितरित्या लढ्याला बळ द्यावे, असे सांगितले.

राजू बिर्जे यांनी दुही माजणार नाही, याची काळजी घ्या, असे स्पष्ट केले. समितीकडे आपला एक स्वत:चा मतदार असून येत्या लोकसभा निवडणुकीत तो इतर पक्षांकडे जाणार नाही यासाठी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी भावना अभय कदम यांनी व्यक्त केली. रमाकांत कोंडुसकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून समितीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. यावेळी धनंजय पाटील, सागर पाटील, शंकर बाबली, प्रशांत भातकांडे, संजय शिंदे यांनी विचार मांडले.

रणजित चव्हाण-पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड

शहर समिती पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. परंतु, मागील दोन बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी अनुपस्थिती लावल्याने अखेर शनिवारी झालेल्या बैठकीत नूतन कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रणजित चव्हाण-पाटील यांची सर्वानुमते कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणीची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article