कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात मजबूत तलवार

07:00 AM Aug 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोळीला मधून फोडण्याइतकी धार

Advertisement

तलवारी या इतिहास, युद्ध आणि संस्कृतीचे प्रतीकं आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली तलवार कोणती याचे उत्तर फारसे कुणाला माहित नसेल. तलवारीच्या सामर्थ्याचे मापदंड वेगवेगळे असू शकतात, यात धार, टिकाऊपणा, डिझाइन आणि ऐतिहासिक महत्त्व सामील असू शकते. तरीही इतिहासात काही तलवारी स्वत:च्या रचना, युद्धात प्रभाव आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे सर्वात शक्तिशाली मानल्या जातात. जपानची कटाना तलवार जगातील सर्वात शक्तिशाली तलवारींपैकी एक आहे. कटाना तलवार केवळ जपान नव्हे तर जगभरात स्वत:च्या अनोख्या आणि अद्भूत डिझाइनमुळे लोकप्रिय आहे. कटाना जपानची लांब तलवार असून त्यात विशेष वळणदार एकधारी पातं असते, जी समुराई योद्ध्यांची ओळख होती. कटाना स्वत:ची बेजोड धार, संतुलन आणि हलक्या वजनासाठी ओळखली जाते. ही तलवार इतकी मजबूत असते की, बंदुकीच्या गोळीचेही दोन तुकडे करू शकते.

Advertisement

कशी होते तयार

या तलवारीच्या निर्मितीची पद्धत शतकांपासून बदललेली नाही. याच्या निर्मितीकरता अनेक आठवडे लागायचे, ज्यात स्टीलला वारंवार वितळवून मजबूत अन् लवचिक केले जायचे. कटाना इतकी धारदार असते की एका झटक्यात हाडं अन् मांस कापू शकते. आजही मार्शल आर्ट्स आणि जपानी संस्कृतीत कटानाचे विशेष महत्त्व आहे.

कटाना तयार करणारे होते खास

कटाना समुराई योद्ध्यांची ओळख होती, हे केवळ एक अस्त्र नव्हते, तर समुराई समुदायाचा आत्मा होते. कटाना धारण करणे कठोर नियमांच्या अधीन होते. जपानमध्ये तलवारबाजांचा अत्यंत आदर केला जात होता. त्यांना केवळ शिल्पकार नव्हे कलाकार आणि अध्यात्मिक गुरूही मानले जात होते. तलवार निर्मिती सुरू करण्यापूर्वी संबंधित लोक शुद्धिकरण विधी करत होते आणि तलवार तयार करण्याच्या प्रक्रियेला एकप्रकारचे ध्यान मानत होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article