सर्वात स्ट्राँग कॉफी
जेव्हा कधी कॉफी आणि चहाप्रेमींमध्ये जुगलबंदी सुरु होते, तेव्हा दोघेही स्वत:ची बाजू मांडत आपलेच पेय सर्वोत्तम असल्याचा दावा करतात. कॉफी पिणाऱ्यांचा तर्क म्हणजे ती अधिक स्ट्राँग असते. म्हणजेच कॉफी प्यायल्यावर माणसात ऊर्जा संचारते, झोप आणि थकवा निघून जातो. कॉफीत पॅफीन नावाचा घटक असल्याने हे घडत असते. तसेही कॉफी वेगवेगळ्या प्रकारची असते. परंतु सध्या एक कॉफी चर्चेत आहे. हिला जगातील सर्वात स्ट्राँग कॉफी ठरविण्यात येत आहे. या कॉफीचे नाव बायोहजार्ड कॉफी आहे. याला जगातील सर्वात स्ट्राँग कॉफीचा दर्जा मिळाला आहे. यात 12 आउन्समध्ये 928 मिलिग्रॅम कॅफीन असते. 12 आउन्सला तुम्हा एका छोट्या कागदी कपाइतके मानू शकतात. डॉक्टरांनुसार माणसाला एक दिवसात केवळ 400 ग्रॅमपर्यंतच कॅफीन ठीक आहे, परंतु या कॉफीत याचे प्रमाण दुप्पटीहून अधिक आहे.
वेगवेगळ्या समयी वेगवेगळ्या कॉफींना जगातील सर्वात स्ट्राँग कॉफीचा दर्जा मिळाला आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी डेथ विश नावाच्या कॉफीला सर्वात स्ट्राँग कॉफी मानले गेले होते, कारण त्यात 200 टक्क्यांपर्यंत कॅफीन कंटेंट असायचे. त्यानंतर ब्लॅक इंसोमया कॉफी आली, ज्यात 12 आउन्समध्ये 702 मिलिग्रॅम कॅफिन असायचे. 2016 मध्ये बायोहजार्ड कॉफी सादर झाली होती.
या कॉफीच्या बॉक्सवर स्पष्ट इशारा नमूद असतो. तसेच कॅफीनच्या प्रमाणाविषयी उल्लेख असतो. जर तुम्ही अधिक प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता असते. या कॉफीद्वारे लोकांना आम्ही ऊर्जा देऊ इच्छितो. अधिक कॉफी प्यायल्याने झोप देखील उडते असे कंपनीचे सह-संस्थापक योनाटन पिनहासोव्ह यांनी सांगितले आहे.