सर्वात मजबूत अन् सुरक्षित बेड
तीव्र भूकंपातही होणार नाही नुकसान
नैसर्गिक आपत्तींमध्ये भूकंपाबद्दल कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी किंवा अलर्ट जारी करता येत नाही. भूकंपामुळे जगाच्या अनेक हिस्स्यांमध्ये झालेले नुकसान पाहिले असते. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास कुठल्याही इमारतीत वाचण्याची संधी फारच कमी मिळते. परंतु ही सर्व आव्हाने पाहता इंजिनियर्सनी एक अजब तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे भूकंपातही कुठलेच नुकसान होणार नाही. हे सर्व शक्य होणार आहे एका अनोख्या बेडमुळे. हा बेड धोक्याच्या स्थितीत बंकरमध्ये रुपांतरित होतो.
हा बेड भूकंप झाल्यावर स्वतःला बंकरमध्ये रुपांतरित करून घेतो. हा बेड अत्यंत मजबूत असल्याने यावर झोपणाऱया व्यक्तीच्या केसालाही धक्का पोहोचत नाही. हा बेड बंकरमध्ये रुपांतरित झाल्यावर संबंधित व्यक्तीला ऑक्सिजन किंवा अन्य आवश्यक गोष्टी प्राप्त होणार आहेत. यामुळे या बंकररुपी बेडवर दीर्घकाळ जिवंत राहता येणार आहे.
या बेड तयार करणाऱया कंपनीने एका व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात भूकंपाच्या धक्क्यानंतर इमारत कोसळू लागली असताना बेड आपोआप फोल्ड होतो आणि एका बॉक्सचा आकार धारण करत असल्याचे दिसून येते. बॉक्स होण्यापूर्वी झोपलेल्या व्यक्तीला त्यात ढकलले जाते. या बेडच्या बॉक्समध्ये पाणी, भोजनासह वैद्यकीय सामग्री इत्यादींची व्यवस्था करण्यात आलेली असते.
या व्हिडिओला आतापर्यंत 15 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे 20 हजार लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. या व्हिडिओवर लोक मोठय़ा संख्येत कॉमेंटही करत आहेत. या बेडची किंमत खूपच अधिक राहणार असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात असले तरीही याची मूळ किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.