महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बससेवेवर आजपासून वाढणार ताण

11:08 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अधिवेशनसाठी 100 बसेस : प्रवाशांची गैरसोय

Advertisement

बेळगाव : हलगा येथील विधानसौधमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यासाठी परिवहनच्या 100 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर परिणाम होणार आहे. विविध ठिकाणी बस कमतरतेच्या तक्रारी वाढणार आहेत. त्यामुळे अधिवेशन काळ प्रवाशांसाठी त्रासदायक ठरणार आहे. परिवहनच्या ताफ्यात बसची कमतरता आहे. त्यातच अधिवेशनासाठी 100 बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बस व्यवस्थेवर ताण वाढणार आहे. विविध ठिकाणी धावणाऱ्या बसफेऱ्या कमी होणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बसवाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत बसस्थानकातून 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावतात. त्यापैकी 150 बसेस आयुर्मान संपलेल्या आहेत. त्यामुळे नादुरुस्तीचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यातच अधिवेशनसाठी जादा बसेसची तजवीज केली आहे. त्यामुळे अधिवेशन काळात बसचे नियोजन करताना परिवहन मंडळाची दमछाक होणार आहे.

Advertisement

सोमवार दि. 4 ते 15 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या काळात पोलीस, कर्मचारी आणि इतर कामांसाठी परिवहनच्या बसचा वापर होणार आहे. यासाठी पोलीस खात्याने परिवहनकडे बसेसची मागणी केली आहे. त्यानुसार परिवहनने अधिवेशनसाठी 50 बसेस सज्ज केल्या आहेत. शिवाय बाहेरून 50 बसेस मागविण्यात आल्या आहेत. मागणीनुसार अधिवेशनसाठी बसेसचे नियोजन केले जाणार आहे. अधिवेशन काळात आंदोलनकर्त्यांची संख्या मोठी असते. रस्ते आणि आंदोलन स्थळावर विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले जाते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी त्यांची धरपकड करून बसमधून बाहेर नेण्यात येते. त्यामुळे अधिवेशन काळात जादा बसेसची मागणी असते. मात्र इतर सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम जाणवणार आहे. आधीच शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बस वाहतुकीची फरफट होऊ लागली आहे. त्यातच अधिवेशनसाठी जादा बसचा वापर होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

शैक्षणिक सहलींसाठी बसेस मिळणार नाहीत

शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. त्यातच अधिवेशनासाठी जादा बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिवेशन काळात शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध होणार नसल्यामुळे सहली खासगी वाहनांतून काढाव्या लागणार आहेत.

पोलीस खात्याकडून बसेसची मागणी

अधिवेशनासाठी 50 बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इतर आगारातून 50 बसेस मागविण्यात आल्या आहेत. पोलीस खात्याकडून बसेसची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अधिवेशनसाठी बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. अधिवेशन काळात शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध होणार नाहीत.

- के. के. लमाणी, डीटीओ परिवहन

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article