महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हवाई दलाची ताकद आणखी वाढणार

06:55 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

97 तेजस लढाऊ विमाने, 156 प्रचंड हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी : सुखोई-30 अपग्रेड केले जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सशस्त्र दलांच्या एकूण लढाऊ क्षमतेला चालना देण्यासाठी भारताने गुऊवारी मोठे निर्णय घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 97 तेजस हलकी लढाऊ विमाने आणि सुमारे 156 प्रचंड हेलिकॉप्टरच्या अतिरिक्त मालाच्या खरेदीसाठी प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. हवाई दल ही विमाने अंदाजे 65,000 कोटी रुपये खर्चून खरेदी करणार आहे. त्याचबरोबर मेगा खरेदी प्रकल्प आणि सुखोई-30 अपग्रेड कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीवर 1.3 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या शस्त्रखरेदीमुळे सशस्त्र दलांची ताकद आणखी वाढणार आहे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेने (डीएसी) भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 फायटर फ्लीटमध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय हवाई दल यापूर्वीच तेजस एमके-1 जेटच्या दोन स्क्वॉड्रन कार्यरत आहे. यात प्रारंभिक आणि अंतिम ऑपरेशनल क्लीयरन्स प्रकारांपैकी प्रत्येकी 20 स्क्वॉड्रन असतात. यापूर्वी, 83 एलसीए एमके1ए प्रकारांसाठी 6 अब्ज अमेरिकन डॉलर्सची ऑर्डर फेब्रुवारी 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयाने एचएएलला दिली होती. या ऑर्डरची पूर्तता  2024 पर्यंत होण्याची अपेक्षा आहे.

400 टॉवर आर्टिलरी गन सिस्टीम खरेदीचाही समावेश

या योजनेत 400 टॉवर आर्टिलरी गन सिस्टीम खरेदी करणे देखील समाविष्ट आहे. यासाठी सुमारे 6,500 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराकडे असॉल्ट रायफल आणि बख्तरबंद वैयक्तिक वाहकांच्या खरेदीशी संबंधित प्रस्तावही बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आले होते.

स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानेही हवाई दलाच्या ताफ्यात सामील होत आहेत. आत्मनिर्भर भारतावर भर देत भारतीय हवाई दलही स्वदेशी बनावटीच्या विमानांकडे वळत आहे. यापूर्वी, भारतीय हवाई दलाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बनवलेले पहिले हलके लढाऊ विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. हे दोन आसनी एलसीए तेजस सर्व हवामानासाठी योग्य आहे. स्वदेशीकरणाचा मार्ग अवलंबत भारताने जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश होण्याच्या पगड्यातून मुक्त करण्यातही यश मिळवले आहे.

भारतीय हवाई दलाने एचएएलला 18 दोन आसनी तेजस विमानांची ऑर्डर दिली होती. 2023-2024 पर्यंत आठ तेजस विमाने भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली जातील. उर्वरित 10 विमाने 2026-27 पर्यंत सुपूर्द केली जातील. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी बेंगळूरमध्ये तेजसच्या उड्डाणाचे कौतुक केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article