पथदीप वेलींनी आच्छादले
महानगरपालिकेचे दुर्लक्ष : पथदीप खुले करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील पथदीप झाडे तसेच वेलींनी वेढले गेले आहेत. त्यामुळे डेकोरेटिव्ह पथदीप केवळ नावापुरतेच राहिल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पथदीपांवर वेली वाढल्या आहेत. यामुळे काँग्रेस रोड येथील पथदीप खुले करावे, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे. काही वर्षांपूर्वी गोगटे सर्कल ते उद्यमबागपर्यंत डेकोरेटिव्ह पथदीप बसविले. यामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडली. परंतु सध्या हे डेकोरेटिव्ह पथदीप देखभालीअभावी बंद पडले आहेत. काही ठिकाणी वेली वाढून त्याचा प्रकाशही दिसून येत नाही. यामुळे पथदीप असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या काँग्रेस रोडवर अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनपाने झाडे झुडपे दूर करून पथदीप खुले करण्यासोबत त्यांची योग्यरित्या दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.