सर्वात अजब मृग
चेहऱ्याचा आकार करतो चकित
जगात हरणाच्या प्रजाती सर्वसाधारणपणे पाहण्यास अत्यंत सुंदर असतात. हा प्राणी कधी स्वत:चे शिंग तर कधी सौंदर्यासाठी ओळखला जातो. परंतु यातील एक प्रजाती अशी आहे जी स्वत:च्या अजब चेहऱ्यासाठी ओळखली जाते. थंड भागांच्या प्रतिकूल स्थितीत स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी याला खास करून ओळखल जाते. अत्यंत अधिक शिकार होत असल्याने सध्या या प्रजातीवर संकट ओढवले आहे.
एकेकाळी यूरेशियाच्या स्टेपी भागांमध्ये आढळून येणारे सैगा मृग कार्पेशियन पर्वत आणि कॉकेशसपासून जूंगारिया आणि मंगोलियापर्यंत दिसून यायचे. परंतु सध्या हे रशिया आणि कजाकिस्तानच्या निवडक भागात दिसून येतात. तर चीन, मंगोलियापासून रोमानिया आणि मालदोवापर्यंत ते विलुप्त झाले आहेत.
सैगा मृगाच्या चेहऱ्याचा आकार अजब असण्यामागे त्यांचे लटकणारे आणि फुललेले नाक असते. यामुळे हे अनेकदा उंटासारखेही दिसतात. परंतु हे बकऱ्याच्या आकाराचेच असतात. त्यांचे नाक हुंगण्याच्या अदभूत शक्ती देत असल्याने ते बदलत्या हवामानाच्या कठोर वातावरणातही तग धरू शकतात. फुललेल्या नाकातूनआत येणाऱ्या हवेतून धूळ बाजूला पडते आणि उन्हाळ्यात यामुळे तप्त हवा थंड होते आणि थंडीत हवा आत जाताच उष्ण होते.
सैगा मृगाची शतकांपासून अनेक कारणांमुळे शिकार केली जाते. याच्या शिंगांची तस्करी केली जाते. शिंगांचे चिकित्सेत शतकांपासून महत्त्व मानले जात राहिले आहे. याचबरोबर त्यांचे कातडे आणि मांसाला देखील बाजारात मोठी किंमत मिळते. तर अनेक शिकारी त्यांना खाण्यासाठी त्यांचा जीव घेतात, यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे.
सैगा मृग मायग्रेटरी अॅनिमल म्हणजेच विस्थापित प्राणी म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजेच हिवाळ्यात ते उत्तरेकडून दक्षिणेस जातात आणि उन्हाळ्यात परत येतात. विस्थापनाच्या काळात उन्हाळ्यापासून हिवाळ्यादरम्यान सुमारे एक हजार किलोमीटरचे अंतर ते चालून कापत असतात. सैगा मृगाची त्वचा दालचिनीच्या रंगाची असते. विस्थापित प्राणी असल्याने आणि वेगवेगळ्या हवामानात राहत असल्याने हा रंगही बदलत असतो. हा प्राणी छोटी रोपे आणि झुडपांची पानं खात असतो. त्यांची विषारी रोप पचविण्याची क्षमता थक्क करते. यामुळे त्यांच्या प्रकृतीला कुठलाच फरक पडत नाही.