प्राण्यांसारखे धावण्याचा अजब ट्रेंड
सोशल मीडियावर चर्चेत हा ट्रेंड
इंटरनेटवर महिला एखाद्या वन्यप्राण्याप्रमाणे धावत, उडी मारत आणि झाडांवर चढत असतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या अजब ट्रेंडची सध्या चर्चा होत आहे. या ट्रेंडला ‘क्वाड्रोबिक्स’ म्हटले जात आहे. याचे कनेक्शन फिटनेसशी आहे. क्वाड्रोबिक्सद्वारे लोक स्वत:मधील प्राण्याला बाहेर काढत आहेत. प्राण्यासारखे चालणे, धावणे आणि उडी मारण्याचा प्रकार सुरू असून लोकांनी याला क्वाड्रोबिक्स नाव दिले आहे. ही व्यायामाची नवी शैली आहे. स्वत:ला फिट ठेवण्याची ही अपरंपरागत शैली सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. क्वाड्रोबिक्स करणारे लोक अस्वलाप्रमाणे सरकत आणि मांजराप्रमाणे उडी मारताना स्वत:चे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. बेल्जियममध्ये जन्मलेली माहितीपट निर्माती एलेक्सिया क्राफ्ट डे ला सॉल्क्स आणि जंगलांमध्ये निसर्गादरम्यान राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाने 2021 मध्ये क्वाड्रोबिक्सशी परिचय घडविला होता. एलेक्सियाने याला एक प्राइमल मूव्हमेंट ठरविले. याच्या सरावाने तिने स्वत:च्या शरीरात अद्भूत परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे.
झाडांवर माकडाप्रमाणे चढणे
28 वर्षीय एलेक्सिया स्वत:चा वेळ स्पेन आणि ब्रिटनमध्ये घालविते. ती बार्सिलोनामध्ये एका चित्रपटाच्या विषयाच्या शोधात असताना तिने झाडांवर माकडांप्रमाणे हालचाली करणाऱ्या एका माणसाविषयी ऐकले होते. हा व्यक्ती विक्टर मॅन्युअल फ्लेइट्स एस्कोबार होता, जो टार्जन मूव्हमेंटचा संस्थापक होता, तो एका आदिम आंदोलाचा हिस्सा होता, त्या इसमासोबत संभाषणाच्या एक तासातच ते त्यांच्यासोबत काम करण्यासाठी सहमत झाले.
अजब ट्रंड
क्राफ्ट डे ला सॉल्क्सने 2022 मध्ये माहितीपट टार्जन मूव्हमेंटच्या चित्रिकरणादरम्यान त्यांच्यासोबत प्रतिदिन 2-3 तासांचे प्रशिक्षण केले. फ्लेइट्स एस्कोबारने तिला अशा पद्धती शिकविली, ज्याबद्दल ती एक माजी व्हॉलीबॉलपटू आणि धावपटू असूनही अनभिज्ञ होती, तिने प्राण्यांसारखे चालणे, झाडांवर चढणे आणि झाडांच्या फांद्यावर लटकणे हे प्रकार शिकले. हे काम मुलांच्या खेळाप्रमाणे वाटत होते, परंतु प्रत्यक्षात ही कठिण कसरत होती, ज्यामुळे तिचे खांदे आणि पोटाचे स्नायू मजबूत झाले. क्राफ्ट डे ला सॉल्क्सने स्वत:चे सर्व प्रशिक्षण अनवाणी पायांनी पूर्ण पेले आणि जमिनीच्या अनुकुलतेनुसार तिचे तळवे अत्यंत मोठे झाले. प्रारंभी सहा महिन्यांपर्यंत दरदिनी वेदना किंवा थकवा जाणायचा. मी खरोखरच मजबूत दिसत होते, असे तिने सांगितले.
अनेक लोकांचा सहभाग
जर्मनीची 20 वर्षीय युवती टिकटॉकवर सोलेइल नावाने प्रख्यात आहे. क्वाड्रोबिक्स निश्चितपणे पूर्ण शरीराचा वर्कआउट आहे. हे सुरू केल्यापासून माझे वजन अत्यंत कमी झाले आहे. मला शरीरात एक नवा फरक दिसून येत असल्याचे तिने सांगितले. सोलेइलने स्वत:च्या निसर्गप्रेमाला क्वाड्रोबिक्ससोबत जोडून टिकटॉकवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती स्वत:च्या व्हिडिओसाठी योग्य पार्श्वभूमीकरता दक्षिण जर्मनी आणि ऑस्ट्रियात अनेक तास पायी चालते.
शारीरिक लाभ क्वाड्रोबिक्सचा सिक्स पॅक प्रभाव
वास्तविक आहे. खासकरून याला स्मार्ट पोषणाशी जोडल्यास हा लाभ मिळतो, असे खासगी प्रशिक्षक नोबे यांनी सांगितले. टिकटॉकर सोलेइल यांनी थेरियनविषयी जाणल्यावर मागील वर्षी क्वाड्रोबिक्स करणे सुरू केले होते. थेरियन हा अशा लोकांचा समूह आहे, जो वन्यप्राण्यांप्रमाणे हालचाली करत असतो.