कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चीनच्या टॉय प्लॅटफॉर्मचा विचित्र नियम

06:14 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिफंडसाठी मुलांना थप्पड लगावतानाचा पाठवा व्हिडिओ

Advertisement

सद्यकाळात बहुतांश लोक स्वत:साठीची सामग्री ऑनलाइन खरेदी करतात आणि ती पसंत न पडल्यास परत करतात. पण चीनध्ये एका ऑनलाइन खेळणी खरेदी-विक्री अॅपवर अजब प्रकरण समोर आले. एका विक्रेत्याने पैसे परत करण्यासाठी एका महिलेकडून अत्यंत चुकीची मागणी केली. आईने स्वत:च्या मुलाला थप्पड लगावतानाचा 5 मिनिटांचा व्हिडिओ पाठविला तरच पैसे करणार असल्याचे या विक्रेत्याने म्हटले.

Advertisement

11 वर्षीय मुलीची आई ली यून यांनी स्वत:ची खरेदी रद्द करण्याचा प्रयत्न केला, तिच्या मुलीने क्वियांदो नावाच्या अॅपवर गुपचूपपणे 500 युआनहून अधिक रक्कम खर्च केली होती. क्वियांदो चीनमधील एक प्रसिद्ध सेकंड-हँड (जुन्या गोष्टींची खरेदी-विक्री करणारा) प्लॅटफॉर्म असून तेथे खेळणी अणि कलेक्शन आइटम खरेदी आणि विकले जातात. चालू वर्षात या अॅपवर एकूण 12 अब्ज युआनपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.

अजब मागणी

ऑर्डरच्या सुमारे दोन तासातच महिलेने विक्रेत्याशी संपर्क साधत ऑर्डर रद्द करण्याचा प्रयत्न केला. तर महिला जाणूनबुजून ऑर्डर रद्द करण्यासाठी अल्पवयीन असल्याचे नाटक करत असल्याचा आरोप विक्रेत्याने केला. यानंतर विक्रेत्याने तिला एक अजब रिफंड नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये यूनला रिफंडसाठी स्वत:च्या मुलीचा पाच मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा लागेल, ज्यात ती मुलीला थप्पड मारत असेल आणि तीन मिनिटांच्या आणखी एका व्हिडिओत तिला ओरडत असावी असे नोटीसमध्ये म्हटले गेले होते.

मुलीलाही ठरविले चुकीचे

याचबरोबर मुलीकडून 1 हजार शब्दांचा माफीनामाही मागविण्यात आला, ज्यावर तिच्या आईवडिलांची स्वाक्षरी आणि बोटांच ठसे असावेत, तसेच तिला हा माफीनामा मोठ्या आवाजात वाचावा लागेल, असे नोटीसमध्ये नमूद होते. यूनने ही बाब क्वियांदो प्लॅटफॉर्मच्या ग्राहक सेवा विभागाला कळविले. परंतु कंपनीने आम्ही या प्रकरणी हस्तक्षेप करू शकत नसल्याचे कळविले. नंतर कंपनीने वक्तव्य जारी करत ही घटना वैयक्तिक सेकंड-हँड विक्रीशी संबंधित असल्याने किरकोळ रिफंड नोटीस आमचे अधिकृत धोरण नसल्याचा दावा केला. या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे, काही लोकांनी मुलीला चुकीचे ठरवत शिक्षा योग्य असल्याची भूमिका घेतली. तर काही जणांनी विक्रेत्याची ही मागणी अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article