नवदांपत्याला काळं फासण्याची अजब प्रथा
जगाच्या विविध हिस्स्यांमध्ये वेगवेगळ्या प्रथा दिसून येतात. भारताच्या विविध हिस्स्यांमध्ये वेगवेगळ्या प्रथा-परंपरांचे पालन केले जाते. परंतु एका देशात अजब प्रथेचे पालन केले जाते. स्कॉटलंडमध्ये ही अजब परंपरा पार पाडली जाते. तेथे विवाह करणाऱ्या जोडप्याच्या चेहऱ्यांना काळा रंग फासला जातो.
स्कॉटलंडमध्ये या परंपरेमुळे नवदांपत्यांच्या आयुष्यात येणारी सर्व नकारात्मक दूर होते आणि त्यांचे जीवन आनंदी होते असे मानले जाते. नवदांपत्याच्या आसपास अनेक प्रकारचे वाईट आत्मे असतात. जेव्हा नवदांपत्याच्या तोंडावर काळे फासले जाते, तेव्हा हे आत्मे दूर होतात अशी तेथील लोकांदरम्यान मान्यता आहे.
पूर्वीच तयारी
ही परंपरा पार पाडण्यासाठी वधू आणि वराचे परिवार तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून खूप आधीपासून तयारी सुरू केली जाते. काळा रंग तयार करण्यासाठी पक्ष्यांचे पंख, बेकार सॉस, खराब झालेले अंडे, नासलेले दूध, बूटांचे पॉलिश इत्यादी गोष्टी जमविल्या जातात. ज्या दिवशी हा विवाह होतो, त्या दिवशी वधू आणि वराच्या शरीरावर या सर्व गोष्टी ओतल्या जातात. यानंतर या जोडप्याला आसपासच्या ठिकाणांवर फिरविले जाते.