For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौथ्या सत्रातही शेअर बाजार तेजीत

06:49 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौथ्या सत्रातही शेअर बाजार तेजीत
Advertisement

सेन्सेक्स 114 अंकांनी वधारला : धातू निर्देशांक मजबूत

Advertisement

मुंबई :

धातू निर्देशांक, स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात तेजीसह बंद होण्यामध्ये यशस्वी झाला. सेन्सेक्स दिवसअखेर 114 अंकांनी वधारत बंद झाला.

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 114 अंकांनी तेजी राखत 73,852 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 34 अंकांनी वधारत 22402 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक देखील 218 अंकांनी वाढत 48,189 अंकांवर बंद झाला. बुधवारच्या सत्रात बाजारात धातू आणि रियल्टी क्षेत्रातील समभागांनी सकारात्मक कामगिरी नोंदवली. आयटी आणि माध्यम क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मात्र नुकसानीसह कामकाज करत होते. हिंडाल्को कंपनीचे समभाग तेजीत होते तर टाटा कंझ्युमरचा समभाग मात्र घसरणीत होता. आरव्हीएनएल या कंपनीचे समभाग एनएसईवर 2.63 टक्के वाढत 284 रुपयांवर पोहोचले होते. दक्षिण रेल्वेने सदरच्या कंपनीला नवे कंत्राट दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

विविध निर्देशांकांचा विचार करता निफ्टी आयटी 0.69टक्के कमकुवत होत बंद झाला. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक काहीशा तेजी समवेत तर ऑटो निर्देशांक काहीसा घसरणीसह बंद झाला. सकाळपासूनच शेअर बाजारामध्ये सकारात्मकता दिसून आली होती. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक तेजी सोबत बंद झाले.

हे समभाग तेजीत

हिंडाल्को, सिप्ला, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, पावरग्रिड कॉर्प, कोटक बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग दमदार तेजीसोबत बंद झाले. दुसरीकडे टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, ग्रासिम इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ, टेक महिंद्रा यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. अदानी समूहातील 10 पैकी तीन कंपन्यांचे समभाग तेजी दाखवत व्यवहार करत होते तर 7 कंपन्या नुकसानीत होत्या.

Advertisement
Tags :

.