महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजार अल्पशा घसरणीसोबत बंद

06:53 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंडनबर्ग अहवालाचा परिणाम नाही: अदानीचे समभाग दबावात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

शनिवारी रात्री उशीरा अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग यांनी अदानी समूहाबाबत नवा आरोप केल्याने रविवारी त्यावर चर्चा घडून आली. पण सोमवारी शेअरबाजारावर मात्र हिंडनबर्ग अहवालाचा म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही, बाजारात अल्पशी घसरण दिसून आली. अदानी समूहातील कंपन्या मात्र दबावात होत्या.

अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने आणखी एक अहवाल प्रसिद्ध करत पुन्हा देशात खळबळ उडवून दिली. अदानी समूह आणि सेबी प्रमुख यांच्यात भागिदारी असल्याचा दावा करण्यात आला. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांच्या पतीचे अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये हिस्सेदारी होती, असे हिंडनबर्ग रिसर्चने म्हटलंय. याप्रकरणी माधबी बुच आणि अदानी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या बातमीचा परिणाम कसा होतो, याकडे तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारच्या शेअरबाजारातील घडामोडींकडे होते. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 56 अंकांनी घसरत 79648 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 20 अंकांनी घसरत 24347 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. याचाच अर्थ हिंडनबर्गचा नव्या अहवालाचा जवळपास काहीच परिणाम दिसला नाही. अदानी ग्रीनचा समभाग 7 टक्के घसरला तर अॅक्सिस बँक मात्र तेजीत होती. सकाळी निफ्टी 47 अंकांच्या घसरणीसोबत 24320 वर सेन्सेक्स 425 अंकांच्या नुकसानीसह 79330 अंकांवर खुला झाला होता.  विविध क्षेत्राच्या निर्देशांकांचा विचार केल्यास धातू निर्देशांक 1.32 टक्के तेजीत तर रियल्टी 0.75 टक्के तेजीत होता. ऑइल अँड गॅस 0.54 टक्के तेजीसोबत बंद झाला. तर दुसरीकडे सार्वजनिक बँकांचा निर्देशांक 1.18 टक्के घसरणीत तर ऊर्जा निर्देशांक 0.69 टक्के घसरलेला दिसला. अॅक्सिस बँकेचे समभाग 1.89 टक्के तेजीसोबत 1164 रुपयांवर बंद झाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article