महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मुहूर्ता’वर शेअर बाजार उजळला

06:43 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवाळीनिमित्त खरेदी-विक्रीचा जोर, सेन्सेक्समध्ये 350 अंकांची उसळी

Advertisement

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisement

यंदाही दिवाळीनिमित्त शेअर बाजारात ‘मुहूर्त’ साधताना उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. प्री-ओपन सत्रानंतर बीएसई निर्देशांक 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला, तर एनएसईचा ‘निफ्टी’ देखील 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह 19,500 ची पातळी ओलांडून उघडला. ‘दिवाळी मुहूर्ता’च्या एका तासाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सलग सहाव्या वषी वाढीसह बंद झाले.

बाजाराच्या विशेष मुहूर्ताच्या व्यवहारात, सेन्सेक्स 345.23 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 65,249.91 च्या पातळीवर उघडला. या विशेष दिवशी बाजारपेठेत खरेदीचे जोमाचे वातावरण पाहायला मिळाले. निफ्टी निर्देशांक 121.90 अंकांच्या किंवा 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 19,529.50 वर उघडला. दमदार प्रारंभानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ होत राहिली आणि सेन्सेक्सने जवळपास 400 अंकांची उसळी घेतली. संध्याकाळी 6.50 वाजता, सेन्सेक्स 372.70 अंकांच्या वाढीसह 65,275 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 101.60 अंकांनी वाढून 19,526 वर होता. 7.15 वाजता व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 354.77 अंकांच्या किंवा 0.55 टक्क्मयांच्या वाढीसह 65,259.45 वर बंद झाला, तर निफ्टी 100.20 अंकांच्या किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 19,525.55 वर बंद झाला.

रविवारी सायंकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 30 कंपन्यांनी दमदार सुऊवात केली होती. या काळात विशेष बाब म्हणजे छोट्या आणि मध्यम समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. टाटा मोटर्स, कोल इंडिया, यूपीएल, इन्फोसिस, ओएनजीसी यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. बँकिंग शेअर्समध्येही वाढ झाल्यामुळे एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी भरपूर कमाई केल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article