पेठा ठरल्या निर्णायक
तरूण भारत संवादचे वृत्त ठरले खरे, पेठामधील मताधिक्यामुळेच क्षीरसागर यांचा विजय सुकर
कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात पेठांमधील मताधिक्य निर्णय असते. यंदाच्या निवडणुकीतही याची प्रचिती आली. राजेश लाटकर यांना कसबा बावडासह लगतच्या परिसरात मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य त्यांना फार काळ टिकवता आले नाही. क्षीरसागर यांना पेठांमध्ये भरघोस मते मिळाली. कसबा बावड्यातील मताधिक्य मागे टाकत क्षीरसागर यांना पेठामधून घेतलेले मताधिक्य निर्णय ठरले.
लाटकर यांना मताधिक्य मिळालेले परिसर
कसबा बावडा, सर्किट हाऊस, कदमवाडी, भोसलेवाडी, सदरबाजार, मुक्तसैनिक वसहत, जाधववाडी, बापट कॅम्प, महाडिक वसाहत, रूईकर कॉलनी,
क्षीरसागर यांना मताधिक्य मिळालेला परिसर
मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शनिवार पेठ, गुरूवार पेठ, शुक्रवार पेठ, शाहूपुरी, राजारामपुरी,
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कसबा बावड्यातच मताधिक्य घटले
कसबा बावडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथून मिळणाऱ्या मताधिक्यावरच काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय निश्चित होतो. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत मात्र, येथील मताधिक्य घटले. गत निवडणुकीमध्ये येथून 8 हजारहून अधिक मताधिक्य मिळाले होते. काँग्रेसच्या नेत्यांना या निवडणुकीत 10 हजारहून अधिक मताधिक्य अपेक्षित होते. परंतू लाटकर यांना 3 हजार 800 इतकेच मताधिक्य मिळाले. 9 फेरीनंतर लाटकर यांना मते कमी मिळू लागली. 12 व्या फेरीपर्यंत कमी अधिक प्रमाण हे लिड टिकून होते. 13 फेरीनंतर मात्र, लाटकर पिछाडीवर राहत क्षीरसागर यांनी मुसंडी घेतली. यानंतर पुन्हा लाटकर यांना मताधिक्य मिळालेच नाही. एकूणच कसबा बावडा येथे अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याचाही फटका लाटकर यांना बसला.
फेरी क्षीरसागर लाटकर मताधिक्य
1 4572 7014 2442 लाटकर
2 3702 5414 1711 लाटकर
3 4712 4419 3861 लाटकर
4 5179 4504 3186 लाटकर
5 4197 4690 3679 लाटकर
6 2843 4690 5485 लाटकर
7 4434 3454 4505 लाटकर
8 4352 3744 3897 लाटकर
9 5000 2698 1595 लाटकर
10 3658 2421 358 लाटकर
11 4076 3780 62 लाटकर
12 4173 4384 273 लाटकर
13 5287 3243 1771 क्षीरसागर
14 7643 2603 6811 क्षीरसागर
15 6193 2200 10804 क्षीरसागर
16 5587 2375 13976 क्षीरसागर
17 5449 2578 16867 क्षीरसागर
18 6273 2471 20669 क्षीरसागर
19 4976 2425 22510 क्षीरसागर
20 5749 3174 25795 क्षीरसागर
21 5303 3527 27571 क्षीरसागर
22 4685 3581 28665 क्षीरसागर
23 2427 1430 29672 क्षीरसागर