महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दौडमध्ये तरुणाईचा सळसळता उत्साह

10:09 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिसऱ्या दिवशी दौडचे जल्लोषी स्वागत : शिवाजीनगरमध्ये सजीव देखाव्यांचे सादरीकरण : देव, देश अन् धर्म रक्षणाचे धडे देणारी दुर्गामाता दौड

Advertisement

बेळगाव : मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात हरविलेल्या तरुणाईला देव, देश आणि धर्म रक्षणाचे धडे देणारी दुर्गामाता दौड तिसऱ्या दिवशी अमाप उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरात आरती व प्रेरणा मंत्र म्हणून दौडला चालना देण्यात आली. पोलीस अधिकारी एसीपी कट्टीमनी व रघू यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला.

Advertisement

दौड मार्गावर देशासाठी झुंजायचं रं, अशी स्फूर्तिगीते धारकऱ्यांनी सादर केली. त्याचबरोबर शिवाजीनगर, गांधीनगर परिसरात दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी रांगोळ्या आणि आकर्षक पताकाही लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. गणेश मंदिर चन्नम्मा सर्कलपासून सुरू झालेली दौड काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगर येथून किल्ला दुर्गामाता मंदिर येथे सांगता झाली.

गांधीनगर परिसरात जल्लोषी स्वागत

गांधीनगर परिसरात दौड दाखल होताच जल्लोषी स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव करत ठिकठिकाणी पूजनही झाले. स्थानिक धारकऱ्यांनी जागोजागी शिवरायांच्या मूर्ती ठेवून सर्वांचे लक्ष वेधले. या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला होता.

शिवाजीनगरमध्ये सजीव देखाव्यांवर भर

शिवाजीनगर परिसरात ठिकठिकाणी सजीव देखावे सादर करून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले. राम मंदिर, मुलगी शिकली प्रगती झाली, विठ्ठल आदी सजीव देखावे सादर करण्यात आले. सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सर्वांसाठी आकर्षण ठरले. त्याचबरोबर पेपर फटाक्यांची आतषबाजी करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून ध्वजाचे पूजन केले.

ऐतिहासिक किल्ला येथील दुर्गामाता मंदिरात सांगता

किल्ला येथील दुर्गामाता मंदिरात महार रेजिमेंटच्यावतीने दौडचे उत्साहात स्वागत करण्यात आले. कर्नल विक्रमसिंग सांकला, सीपीआय महांतेश दामण्णावर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. स्फूर्तीगीत आणि आरती करून शनिवारच्या दौडची सांगता करण्यात आली. यावेळी लेफ्टनंट कर्नल गौरव शेगाव, सुभेदार केंपण्णा पाटील, सुभेदार शेखर पाटील, माजी सुभेदार एम. कित्तूर, अशोक कंदाडे, परशराम मुरकुटे उपस्थित होते. नवरात्रोत्सवामुळे किल्ला येथील दुर्गामाता मंदिरमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यातच शनिवारी दौडमुळे भाविक, शिवभक्त आणि धारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

दौडचा उद्याचा मार्ग...

शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून प्रारंभ होणार आहे. एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड हरिमंदिर, चिदंबरनगर, हदुगेरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, ध. संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली येथून महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article