For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायकल, दिगंबर यांच्याविरुद्धची याचिका सभापतींनी फेटाळली

11:18 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मायकल  दिगंबर यांच्याविरुद्धची याचिका सभापतींनी फेटाळली
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली होती याचिका

Advertisement

पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अपात्रतासंबंधी दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली आहे. दि. 9 जुलै 2022 रोजी आमदार मायकल लोबो आणि 10 जुलै 2022 रोजी आमदार दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सभापतीकडे याचिका दाखल करून लोबो आणि कामत यांना अपात्रता करण्याची मागणी केली होती. याच दरम्यान 14 सप्टेंबर 2022 रोजी काँग्रेसच्या मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि ऊडॉल्फ फर्नांडिस या आठ आमदारांनी पक्षांतर करत दोन तृतियांश विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी वरील आठ आमदारांना अपात्रता करण्याची याचिका सभापतीकडे दाखल केली होती. याशिवाय प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी आणखी एक याचिका दाखल करून वरील आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली. तसेच एका नागरिकानेही या आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सभापतीनी आमदार लोबो आणि कामत यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी घेतली. यावेळी पाटकर यांच्यातर्फे अॅड. अभिजीत गोसावी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. गुऊप्रसाद नाईक यांनी सहकार्य केले. लोबो आणि कामत यांच्यातर्फे अॅड. पराग राव यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अखिल पर्रीकर यांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.