प्रती पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात रंगला हरिनामाचा गजर !!
रत्नागिरीत कार्तिकी एकादशी उत्सवाने भक्तीमय वातावरण; हजारो भाविकांनी घेतले दर्शन, यात्रेला मोठी गर्दी
रत्नागिरी :
रत्नागिरीतील प्रतीपंढरपूर मानल्या गेलेल्या श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पहाटे काकड आरती आटपल्यानंतर हजारो भाविकांनी दिवसभर दर्शनाचा लाभ घेतला. भजन, किर्तनातून हरिनामाच्या गजराने सारे वातावरण भक्तीमय होऊन गेले होते. या उत्सवाच्या यात्रेमुळे रत्नागिरी शहर जणू गजबजून गेले होते.
या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीचा उत्सव येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होतो. मंगळवारीही कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिर परिसर व शहर उत्सवानिमित्ताने पहाटेपासूनच गजबजून गेले होते. त्यामुळे येथील वातावरण भक्तीमय झालेले दिसले. येथील उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच रत्नागिरी शहरात भाविकांची गर्दी वाढली.
श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीला पहिली पूजा झाल्यानंतर पहाटे काकड आरती होऊन उत्सवाला प्रारंभ झाला. मंदिरात दिवसमर भजनांद्वारे हरिनामाचा गजराने परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात श्री विठुरायाच्या दर्शनासाठी रांग लागली होती.
सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी मोठ्या रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला. उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक
झळाळून गेला होता तर या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी दिवसभर झुंबड उडाली होती. त्यातून लाखोची आर्थिक उलाढाल झाल्याचे व्यापारीवर्गातून सांगण्यात आले.