10 अब्ज वर्षानंतरही जिवंत आहे मृत ताऱ्याचा ‘आत्मा’
वैज्ञानिकांनी ब्रह्मांडात एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलमधून निघणारा आतापर्यंतचा सर्वात तीव्र प्रकाश चमक (फ्लेयर) पाहिला आहे. हा फ्लेयर इतका तीव्र होता की, 10 ट्रिलियन (10 लाख कोटी) सूर्यांइतका प्रकाश विखुरला जात होता. हा शोध ब्लॅकहोलच्या रहस्यांना समजून घेण्यास मोठी मदत करणार आहे. हा प्रकाश आणि ऊर्जेचा विस्फोट ब्लॅकहोलच्या आसपासच्या गॅस डिस्कमध्ये गडबड किंवा गुरफटलेल्या चुंबकीय क्षेत्रांमधून आलेला असू शकतो.
फ्लेयर काय आहे?
ब्लॅक होल ब्रह्मांडाचा सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली हिस्सा आहे. त्यातही प्रकाशही अडकून पडतो. सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल तर लाखो-कोट्यावधी सूर्यांइतके मोठे असतात, कधीकधी त्यांच्या आसपासच्या तप्त गॅस डिस्कमध्ये चुंबकीय क्षेत्र गुरफटून जाते, यामुळे प्रकाश आणि ऊर्जेचा विस्फोट होतो, ज्याला फ्लेयर म्हटले जाते, हाच ताऱ्याचा ‘आत्मा’ आहे. हा फ्लेयर वैज्ञानिकांनी ब्लॅक होलच्या आतील रहस्य दाखवितो. जसे एखादी टॉर्च काळोखयुक्त खोलीला प्रकाशमान करून सोडते. या फ्लेयरमुळे वैज्ञानिक ब्लॅकहोलच्या आसपासच्या वातावरणाला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतील.
कधी आणि कसा लागला शोध?
हा चमकदार फ्लेयर 2018 मध्ये पॅलिफोर्नियाच्या पालोमार वेधशाळेच्या कॅमेऱ्याने टिपला. हा फ्लेयर तीन महिन्यांपर्यंत भयानक चमकला आणि त्यानंतर हळूहळू कमी होत गेला. वैज्ञानिकांना प्रारंभी आकड्यांवर भरवसा झाला नव्हता. पॅलिफोर्निया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे अध्ययनकर्ते मॅथ्यू ग्रॅहम यांनी सर्वप्रथम आम्ही ऊर्जेच्या आकडेवारीवर विश्वासच ठेवू शकलो नाही, असे सांगितले. हा शोध नेचर एस्ट्रोनॉमी नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
एका ताऱ्याची कहाणी
हा फ्लेयर एक मोठा तारा ब्लॅकहोलच्या अत्यंत नजीक गेल्यानेच आला आहे. ब्लॅक होलच्या जबरदस्त गुरुत्वाकर्षणाने ताऱ्याला तुकड्यांमध्ये तोडले आहे. याला टाइडल डिसरप्शन इव्हेंट म्हटले जाते. ताऱ्याचे तुकडे ब्लॅकहोलमध्ये कोसळून तप्त झाले आणि चमकदार प्रकाश त्यांनी सोडला. हा प्रकाश अत्यंत तीव्र असल्याने तो दूरवरूनही दिसला आहे.
ब्लॅकहोल : ब्रह्मांडाचा रहस्यमय राजा
आमची आकाशगंगा मिल्की वेसमवेत जवळपास प्रत्येक मोठ्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल असतो. परंतु वैज्ञानिक अद्याप हे कसे तयार होतात हे जाणत नाही. हे विशाल ब्लॅकहोल लाखो-कोट्यावधी सूर्यांइतके वजनी असतात. त्यांचे अध्ययन केल्याने वैज्ञानिक ब्लॅकहोलच्या आसपासच्या ताऱ्यांच्या भागाला (स्टेलर नेबरहुड) समजू शकतात. हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्सचे जोसेफ मिशेल यांनी हा शोध आम्हाला ब्रह्मांडाच्या प्रारंभिक काळात सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोल आणि त्याच्या आसपासच्या वातावरणादरम्यान संपर्काला तपासण्याची संधी देत असल्याचे सांगितले आहे.
शोधाचे महत्त्व
हा फ्लेयर केवळ एक प्रकाशाचा विस्फोट नव्हे तर ब्रह्मांडाच्या इतिहासाची झलक आहे. ब्रह्मांडाच्या युवा काळात (10 अब्ज वर्षांपूर्वी) ब्लॅक होल कसे काम करत होते हे जाणणे वैज्ञानिकांसाठी मोठी गोष्ट आहे. यातून आकाशगंगा कशा निर्माण झाल्या आणि ब्लॅक होल कसे विकसित झाले हे कळणार आहे. भविष्यात अशा फ्लेयर्सना पाहिल्याने ब्लॅकहोलचा जन्म आणि विकासाचे रहस्य सोडविता येणार आहे. ब्रह्मांड किती विशाल आणि रहस्यमय आहे हे या शोध दर्शवून देतो.
ब्रह्मांड तयार होताना ही चमक
फ्लेयर एक सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोलमधुन आला, जे पृथ्वीपासून 10 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा आतापर्यंतचा सर्वात दूरवरील फ्लेयर आहे. एक प्रकाशवर्ष जवळपास 6 ट्रिलियन मैल लांब असते, म्हणजेच हा प्रकाश ब्रह्मांडाच्या युवा काळातून आला आहे, जेव्हा ब्रह्मांड आताच निर्माण झाले होते.