'चिऊताई चिऊताई दार उघडं' गाणं झालं हीट
04:27 PM Mar 04, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
सुशीला सुजित चित्रपटाचे पहिल्या गाण्यालाच दणकून प्रतिसाद
मुंबई
अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी यांनी आगामी "सुशीला सुजित" या चित्रपटातील खास गाणं केलं आहे. या गाण्याला तरुणाईने मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. अमृता खानविलकरच्या करिअरमधील हे पहिलेच आयटम सॉंग तिने केले आहे. गश्मीर आणि अमृता या दोघांचा चिऊताई चिऊताई दार उघड या गाण्यातील पर्फॉर्मन्सचे सगळीकडूनच कौतुक होत आहे.
या गाण्याला आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. कविता राव आणि प्रविण कुंवर यांनी हे गाणं गायले आहे. तर गाण्यातील शब्द मंदार चोळकर यांचे आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळाल्याने चित्रपट बॉक्स ऑफीसवर काय जादू करतो, हे पहावेच लागेल.
Advertisement
Advertisement