For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात दुर्गंधीयुक्त सूप

06:29 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्वात दुर्गंधीयुक्त सूप
Advertisement

पिताच होऊ लागते उलटी

Advertisement

जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त खाद्यपदार्थांमध्ये चीनचे डौझी सूप सामील आहे. हे फर्मेंटेड मूंग बीन ज्यूस केवळ स्वत:चा तीव्र दुर्गंध नव्हे तर विचित्र स्वादासाठी कुख्यात आहे. याचा पहिला चमचा तेंडात टाकताच लोक उलटी करू लागतात. बीजिंगच्या पारंपरिक ब्रेकफास्टचा हिस्सा ही डिश महागड्या रेस्टॉरंटमध्ये देखील सर्व केली जाते. परंतु काही स्थानिकच हे सूप पचवू शकतात.

डौझी बीजिंग कुजीनचा एक अनोखा हिस्सा आहे. हे सेलुलॉइड नूडल्स तयार करण्याच्या प्रक्रियेचा बायप्रॉडक्ट आहे. मूंग बीन्सना पाण्यात भिजवून दळले जाते. मग स्टार्च काढल्यावर तरल फर्मेंट केले जाते. फर्मेटेशनुमळे किंचित करडा रंग, हिरव्या भाज्यांसाठी सुगंध आणि तीव्र आंबट चव तयार होते. स्वाद असा असतो की, याला ‘एक्वायर्ड टेस्ट’ म्हटले जाते, म्हणजे सवय असेल तरच पसंत पडते. बीजिंगचे स्थानिक याला फोकक्वा (सॉरडो बुन) आणि यौ ताओ (फ्राइड डो)सोबत खातात, जे पचनासाठी चांगले मानते. परंतु विदेशी नागरिकांना हे विषासारखे वाटते. अनेक लोक केवळ एका चमचा सूप सेवन करताच उलटी करू लागतात.

Advertisement

अत्यंत प्रसिद्ध डिश

ही डिश बीजिंगच्या स्ट्रीट वेंडर्सपासून हाय-एंड रेस्टॉरंटमध्येही उपलब्ध आहे. या सूपची किंमत 10-20 युआन प्रति बाउल असते. परंतु महागड्या ठिकाणी याला विशेष स्वरुपात सादर केले जाते, जेथे पर्यटक याला चॅलेंजप्रमाणे ट्राय करतात. डौझीचा इतिहास अत्यंत जुना आहे. ही डिश किंग डायनेस्टीशी (1644-1912) निगडित असल्याचे समजते. मूंग बीन्सच्या प्रोसेसिंगमधून शिल्लक तरल फेकण्याऐवजी फर्मेंट केला जात होता. फर्मेटेशन बॅक्टेरियामुळे होते, जे प्रोबायोटिक्स निर्माण करतात, याचे अनेक आरोग्य लाभ आहेत, यात उत्तम पचनक्रिया आणि इम्युनिटी सामील आहे. परंतु याचा दुर्गंध अमोनियासारखा असून जो सडलेले अंडे किंवा योगर्टची आठवण करून देतो.

Advertisement
Tags :

.