कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात दुर्गंधीयुक्त पक्षी

07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निसर्ग किती अनोखा आहे, हे समजून घेण्यासाठी अनोख्या जीव-जंतूंकडे पहावे लागते. निसर्गाने प्रत्येक जीवाला एक खास वैशिष्ट्या दिले आहे, याच्याच मदतीने हा जीव बहरत असतो. असाच एक अनोखा पक्षी असून त्याला जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त पक्षी मानले जाते, कारण त्याच्या शरीरातून शेणासारखा वास येत असतो. या पक्षाचे नाव होआटजिन असून तो एका फीजेंटप्रमाणे दिसतो. हा जगातील एकमात्र असा पक्षी आहे, जो स्वत:च्या भोजनला फर्मेंट (किण्वन) करतो. असामान्य पचनतंत्रामुळे या पक्ष्याला जगातील सर्वात दुर्गंधयुक्त पक्षी देखील मानले जाते. होआटजिन एक अत्यंत अजब पक्षी आहे. हा अमेझॉनच्या बॅकवॉटर्स असलेल्या भागांमध्ये आढळून येतो. याची पिल्लं पंज्यांनी युक्त पंखांसह जन्म घेतात. हा एका प्राचीन पक्ष्याच्या वंशाचा अखेरचा जीवित सदस्य आहे. सुमारे 64 दशलक्ष वर्षांपूर्वी संबंधित पक्षी आढळून येत होता असे मानले जाते. या अजब जीवाला सर्वाधिक दुर्गंधासाठी ओळखले जाते, याचमुळे याला ‘स्टिंकबर्ड’ हे टोपणनाव मिळाले आहे.

Advertisement

Advertisement

यामुळे येतो गंध

होआटजिन एकमात्र ज्ञात पक्षी प्रजाती आहे, ज्याच्याकडे गायींसारखे फोरगट फर्मेंटेशन सिस्टीम आहे. हा पक्षी महत्त्वपूर्ण प्रमाणात मिथेन वायूला सातत्याने उत्सर्जित करतो. दुर्गंधयुक्त ढेकर अन् मलामुळे देखील या पक्ष्यामधून असा गंध येतो. बहुतांश पक्ष्यांमध्ये गळ्यानजीक अन्न साठविणारी पाउच असते, ज्याला क्रॉप म्हटले जाते. याचा वापर थोड्या प्रमाणात अन्नाला उलटी करण्यासाठी केला जातो. याच्या माध्यमातू पिल्लांना अन्न भरविले जाते. परंतु होआटजिनमध्ये हा अत्यंत मोठा असतो आणि खालेल्या पानांसाठी फर्मेंटेशन चेंबरप्रमाणे काम करतो. या चेंबरमध्ये खास बॅक्टेरिया असतात, जे गिळलेल्या पानांना तोडतात, याला पूर्णपणे पचण्यासाठी सुमारे 45 तास लागतात. या असामान्य स्वरुपाने लांब पचनक्रियेदरम्यान पक्षी ढेकरांच्या माध्यमातून वायू बाहेर सोडतो, जो त्याच्या विशिष्ट शेणासारखा गंध निर्माण करतो.

कमी उ•ाण क्षमता

होआटजिनच्या गळ्यात असलेला क्रॉप इतका मोठा असतो की यामुळे पक्ष्याच्या उ•ाणाच्या स्नायूंसाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही. यामुळे प्रौढ पक्षी केवळ काही काळासाठी उडू शकतो. सर्वसाधारणपणे तो एका झाडावरून दुसऱ्या झाडापर्यंत प्रवास करू शकतो. याचमुळे त्याच्या पंखात पंज्ये निर्माण झालेले असतात, जे त्याला फांदीला पकडण्यास मदत करतात. त्याचा शेणासारखा गंध शिकाऱ्यांना दूर ठेवण्यास मदत करतो. परंतु काही शिकारी म्हणजेच ग्रेट ब्लॅक हॉक, वीजलसारखी टायरा, भोजनसाठी दुर्गंधाला सामोरे जाण्यास तयार असतात. 2024 मध्ये वैज्ञानिकांनी 360 हूनअधिक पक्षी प्रजातींच्या जीनोमचे विश्लेषण आणि मॅपिंग केले, जेणेकरून पक्षी समुहांचा एक फॅमिली ट्री तयार करता येईल, परंतु होआटजिन, शोर बर्ड्स आणि क्रेन्स अन्य कुठल्याही समुहाशी साधर्म्य नसलेले ठरले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article