भारतातील सर्वात छोटी रेल्वे
भारतीय रेल्वे आता दुर्गम क्षेत्रांपर्यंत स्वत:ची सेवा पुरवत आहे. भारतात दरदिनी 13 हजारांहून अधिक रेल्वेगाड्यांचे संचालन होते आणि याद्वारे कोट्यावधी लोक स्वत:चा प्रवास दररोज पूर्ण करत असतात. परंतु भारतीय रेल्वेच्या कुठल्या रेल्वेगाडीत सर्वात कमी डबे जोडले जातात आणि ही रेल्वे किती अंतरापर्यंत प्रवास करते हे तुम्हाला माहित आहे का?
सीएचटीपासून एर्नाकुलम जंक्शनदरम्यान एक रेल्वे धावते. ही रेल्वेगाडी केवळ 9 किलोमीटरचे अंतर कापत असते. या दरम्यान ही रेल्वेगाडी केवळ एका थांब्यावर थांबते. याचबरोबर ही रेल्वे हा पूर्ण प्रवास 40 मिनिटांमध्ये पूर्ण करत असते.
सीएचटीपासून एर्नाकुलम जंक्शनदरम्यान धावणारया या डीईएमयू रेल्वेला सर्वात छोटी रेल्वेसेवा असण्याचा मान प्राप्त आहे. या रेल्वेत केवळ तीनच डबे जोडलेले असतात. या रेल्वेत जोडल्या जाणाऱ्या तीन डब्यांमध्ये 300 प्रवाशांसाठी आसनव्यवस्था आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने रेल्वेकडून आता ही सेवा रोखली जाण्याची शक्यता आहे. परंतु तूर्तास ही रेल्वे सेवा सुरू आहे.
भारतात रेल्वेमार्गांची एकूण लांबी 1,26,366 किलोमीटर इतकी आहे. यात रनिंग टॅकची लांबी 99,235 किलोमीटर आहे. तर यार्ड आणि साइडिंग सारख्या गोष्टी एकत्र केल्यास एकूण मार्ग 1,26,366 किलोमीटर लांबीचा आहे.