सर्वात छोटे शहर, केवळ 52 जणांचे वास्तव्य
जगातील सर्वात छोट्या देशात व्हॅटिकन सिटीला समाविष्ट केले जाते, येथील लोकसंख्या 764 इतकी आहे. तर याचे क्षेत्रफळ 44 हेक्टर आहे. बहुतांश लोकांना या देशाविषयी माहिती असून हा इटलीच्या रोम सिटीच्या आत वसलेला आहे. परंतु जगातील सर्वात छोटे शहर कोणते याचे उत्तर अनेकांना देता येणार नाही.
जगातील सर्वात छोटे शहर पर्वतावर वसलेले असून तेथे केवळ 52 जणांचे वास्तव्य आहे. परंतु या शहराला एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्धी मिळाली आहे. या शहराचे नाव ह्यूम असून ते क्रोएशियात आहे. इस्त्रियाच्या पर्वतांवर वसलेले हे छोटे शहर केवळ 100 मीटर लांब आणि 30 मीटर रुंदीपर्यंत फैलावलेले आहे. यात दोन मनमोहक दगडांच्या गल्ल्या आणि तीन जिन्यासारख्या संरचना आहेत.
ह्यूम शहराची रचना मध्यकालीन युगापेक्षाही पूर्वीची आहे. याचा सर्वात प्रथम उल्लेख ‘चोलम’च्या स्वरुपात 12 व्या शतकातील अभिलेखांमध्ये मिळतो. तर या शहराला मिरना नदीच्या खोऱ्याला वसविताना शिल्लक राहिलेल्या दगडांनी निर्माण करण्यात आले होते. शतकांपर्यंत युद्धाच्या मैदानांदरम्यान वसलेल्या या शहरात सुरक्षेशी निगडित कार्ये केली जात होती. परंतु नंतर स्थिती बदलल्यावर तेथे वॉच टॉवर, घंटा आणि अन्य गोष्टी निर्माण करण्यात आल्या. या शहराची लोकप्रियतेचे कारण याचा छोटा आकार तसेच प्राचीन असणे तर आहेच. परंतु मद्याचा खास ब्रँड बिस्कामुळे हे शहर चर्चेत आहे. ही मिस्टलेटो-युक्त फळ ब्रँडी एक प्राचीन सेल्टिक ड्य्रूड रेसिपीवर आधारित असून जे 2000 वर्षांपेक्षाही जुने मद्य आहे.
बिस्काला जगातील सर्वात चांगले श्नॅप्स मानले जाते. श्नॅप्सचा अर्थ मद्य असा होतो, याचबरोबर दरवर्षी येथे प्रीफेटची निवडणूक होते. प्रीफेट लोकांमधील भांडणं मिटविते. यात विजय प्राप्त करणाऱ्यांना सर्वात चांगली बिस्का पिण्यास दिली जाते. 1977 पूर्वी ही प्रथा बंद पडली होती. परंतु मागील वर्षी ती पुनरुज्जीवित करण्यात आली आहे. ही शतकांपेक्षा जुनी प्रथा जूनमध्ये ‘ह्यूम’च्या दिनी पार पडते, तेव्हा पुरुष टाउन हॉलमध्ये एकत्र येत प्रीफेक्ट निवडतात. ते स्वत:च्या पसंतीला ‘रबोस’ नाच्या लाकडी छडीवर लिहून निवड करतात.