सर्वात छोटी गल्ली
जगात जे विश्वविक्रम नोंदविले जातात, त्यातील अनेक तर अत्यंत विचित्र असतात. तुम्ही सर्वात लांब गल्लीच्या विक्रमाविषयी ऐकले असेल परंतु सर्वात छोट्या गल्लीविषयी कधी ऐकले आहे का? सर्वात छोटी गल्ली असण्याचा विक्रमही नोंदविला गेला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार जगातील सर्वात छोटी गल्ली ब्रिटनमध्ये आहे. याची लांबी केवळ 6 फूट आहे. परंतु याचा भूतकाळ अत्यंत विचित्र आहे. ही गल्ली एबेनेजर प्लेस आहे.
एबेनेजर प्लेस 2.06 मीटरच्या लांबीसह गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात छोटी गल्ली असण्याचा विक्रम बाळगून आहे. याची लांबी पृथ्वीवर सर्वात उंच व्यक्तीपेक्षाही कमी आहे. स्कॉटलंडच्या कॅथनेसच्या विकमध्ये स्थित या छोट्या गल्लीचा केवळ एकच पत्ता आहे, जो मॅकेज हॉटेलचा हिस्सा क्रमांक 1 बिस्ट्रो आहे.
एबेनेजर प्लेसचा इतिहास 1883 पासून सुरू होतो. जेव्हा 1 एबेनेजर प्लेसची निर्मिती करण्यात आली होती. इमारतीच्या मालकाला हॉटेलच्या सर्वात छोट्या हिस्स्यावर नाव लिहिण्यास सांगण्यात आले होते. याला अधिकृतपणे 1887 मध्ये एका गल्लीच्या स्वरुपात मान्यता देण्यात आली होती. मॅकेज हॉटेलचे वर्तमान मालक मरे लॅमोंट यांनी दररोज लोक येथे उभे राहून फोटो काढून घेत असलयाचे सांगितले आहे. लॅमोंट यांनी गल्लीचा आकार सिद्ध करण्यासाठी दस्तऐवज सादर केल्यावर विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मुख्य अधिकाऱ्याने या गल्लीला पाहण्यासाठी 50 तासांचा प्रवास केला होता.
हॉटेलची निर्मिती 1883 मध्ये अलेक्झेंडर सिंक्लेयर यांनी केली होती, त्यांच्या परिवाराकडे कॅथनेसमध्ये जमीन होती. त्यावेळी परिषदेने हॉटेलच्या छोट्या कोपऱ्याला एका नव्या गल्लीच्या स्वरुपात मान्यले आणि सिंक्लेयर यांना याचे नाव ठेवण्याचा निर्देश दिला. एबेनेजर प्लेसला 1887 मध्ये शहराच्या नोंदीत स्थान मिळाले होते.