जगातील सर्वात छोटे बेट
बेटावर एक घर, दरवाजा उघडला तर समोर पाणी
जगभरात अनेक सुंदर बेटं असून ती पाहिल्यावर स्वर्गासारखी अनुभूती होत असते. काही बेटं ही आकाराने मोठी तर काही छोटी असतात. ग्रीनलँडला जगातील सर्वात मोठ्या बेटाचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु जगातील सर्वात छोट्या बेटावर केवळ एकच घर आहे. हे बेट इतके छोटे की यातील घराचा दरवाजा उघडला तर समोर पाणीच दिसून येतश. जगातील सर्वात छोट्या बेटावर एक घर आणि एक वृक्ष दिसून येतो. या बेटाचे नाव ‘जस्ट रुम इनफ आयलँड’ आहे. याला हब आयलँड असेही म्हटले जाते. हे बेट अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये थाउजेंड आयलँड्स चेनमध्ये आहे. हे बेट सुमारे 3300 चौरस फुटांमध्ये फैलावलेले आहे. 1950 च्या दशकात साइजलँड परिवाराने हे बेट खरेदी केले होते, त्यानंतर तेथे एक घर उभारण्यात आले. तेथे आता एक वृक्ष आणि झुडूपं दिसून येतात.
साइजलँड परिवाराने हे बेट सुटी व्यतित करण्यासाठी खरेदी केले होते. परंतु बेटाचा आकार अत्यंत छोटा असल्याने पूर्ण परिवाराला येथे सुटी घालविणे शक्य नाही. परंतु परिवाराला नंतर या बेटाचा विसर पडला होता. या बेटासंबंधी अनेक संकेतस्थळे, नियतकालिकांमध्ये छापून आले आहे. द वॉशिंग्टन पोस्टने 2010 मध्ये या बेटाविषयी एक लेख प्रकाशित केला होता. या लेखाचे नाव ‘वन मिस स्टेटप अँड यु आर स्वीमिंग’ असे होते. जगातील सर्वात छोट्या बेटावर निर्माण करण्यात आलेले हे घर एका कोपऱ्यातून सुरु होत बेटाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर संपते. येथे पर्यटक येऊ शकत नाहीत, कारण ही खासगी मालमत्ता आहे. पर्यटक दूरून या बेटाला पाहू शकतात. परंतु बेट आणि त्यावरील घरात जाऊ शकत नाहीत. जस्ट रुम इनफ आयलँडपूर्वी बिशप रॉय हे सर्वात छोटे बेट होते. परंतु 1982 मध्ये लाइटहाउस ऑटोमॅटिक झाल्यावर त्याने हा मान गमाविला आणि तेथे आता कुठलाच मनुष्य राहत नाही.