कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगातील सर्वात छोटे हॉटेल

06:22 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात हॉटेल केवळ हॉटेल केवळ वास्तव्याचे नव्हे तर अनोख्या आणि लक्झरी अनुभवाचे माध्यमही  ठरले आहे. यातील काही हॉटेल इतकी खास आहेत की, त्यांची चर्चा पूर्ण जगात होते. असेच एक अनोखे हॉटेल असून त्याला जगातील सर्वात छोटे हॉटेल म्हटले होते.

Advertisement

हे हॉटेल जपानच्या टोकियो शहरात असून याचे नाव द कॅप्सूल हॉटेल द मिनी इन आहे. नावानेच हे काही साधारण हॉटेल नसल्याचा अंदाज बांधता येतो. हे हॉटेल आकारात अत्यंत छोटे आहे आणि केवळ एक व्यक्ती किंवा कमाल दोन लोकांसाठीच निर्माण करण्यात आले आहे. या हॉटेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्या याची रुम नसून अनुभव आहे.

Advertisement

किती मोठी आहे रुम?

या हॉटेलमध्ये कॅप्सूल रुमचा आकार सुमारे 2.5 फूट रुंद, 6 फूट लांब आणि 4 फूट उंच आहे. यात बेड, छोटीशी प्रकाशदाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. याच्या डिझाइनरनी पूर्णपणे स्मार्ट आणि कॉम्पॅक्ट स्वरुपात ही रुम तयार केली आहे. पॅप्सूल हॉटेलचे हे तंत्रज्ञान जपानमधील जागेची कमतरता आणि जलद जीवनशैलीवरील तोडगा आहे. टोकियो सारख्या मोठ्या शहरांमध्ये जागेच्या किमती प्रचंड आहेत, याचमुळे छोट्या छोट्या रुम्समध्ये लोकांना आराम देण्याची ही अनोखी पद्धत विकसित करण्यात आली आहे.

खासगीत्व आणि आराम दोन्ही

हे हॉटेल केवळ झोपण्यापुरती नसून येथे लोकांना खासगीत्व आणि आराम दोन्ही मिळते. प्रत्येक कॅप्सूलनजीक साउंडप्रूफ भिंती, एअर व्हेटिंलेशन आणि लाइटिंग सिस्टीम आहे. याचबरोबर शेअरिंग बाथरुम आणि लाउंज एरिया देखील आहे. यामुळे लोकांना आवश्यक सुविधा मिळतात. हे हॉटेल अशा प्रवाशांसाठी उत्तम पर्याय आहे, जे अनोखा आणि स्मरणीय अनुभवाचा शोध घेत असतात. कॅप्सूल हॉटेलमध्ये वास्तव्य खरोखरच वेगळा अनुभव आहे. अनेक पर्यटक याला जपानचा मिनी रुम चमत्कार देखील म्हणतात.

नेहमी फुल असते बुकिंग

जगातील सर्वात छोट्या हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग नेहमीच फुल असते. छोट्या आकारानंतरही हे हॉटेल सुरक्षा, सुविधा आणि आरामाप्रकरणी  कुठल्याही मोठ्या हॉटेलपेक्षा कमी नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article