For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायिकेने पतीचा करविला दुसरा विवाह

06:15 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
गायिकेने पतीचा करविला दुसरा विवाह
Advertisement

स्वत:चे करियर जपण्यासाठी उचलले पाऊल

Advertisement

जगात स्वत:च्या पतीचा दुसरा विवाह करवू पाहणारी महिला नसेल. परंतु अलिकडेच मलेशियात एका प्रसिद्ध गायिकेने स्वत:च्या पतीसाठी दुसरी पत्नी शोधून त्याचा विवाह करविण्याच्या योजनेविषयी खुलासा करत लोकांना चकित केले आहे.

42 वर्षीय एजलाइन अरिफिन यांना एजलिन या नावाने देखील ओळखले जाते. 2003 मध्ये तिने अवांट-गार्डे हाय हाय बाय बायद्वारे देशभरात प्रसिद्धी मिळविली होती. आता तिच्या इन्स्टाग्रामवर 1 लाख 73 हजार फॉलोअर्स आहेत. मागील दोन वर्षांमध्ये कुठलेच नवे गाणी प्रदर्शित न करताही ती सुके शॉप यासारख्या मलेशियन टेलिव्हिजन शॉपिंग चॅनेल्सवर सक्रीय असते आणि स्वत:च्या फॉलोअर्सना फूड प्रॉडक्ट्स विकते.

Advertisement

अलिकडेच एजलिनने सार्वजनिक स्वरुपात स्वत:चा 47 वर्षीय पती वान मोहम्मद हफीजमचा मागील वर्षी 26 वर्षीय युवतीशी करविण्यात आलेल्या दुसऱ्या विवाहाचा खुलासा केला आहे. या विवाहाची आयडिया माझीच होती. पतीला दुसऱ्या पत्नीसोबत राहता यावे आणि मला स्वत:च्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रीत करणे सोपे ठरावे म्हणून हा निर्णय घेतल्याचे एजलिन सांगते.

मी अत्यंत बिझी व्यक्ती असून माझ्या कामासाठी मला मोठा प्रवास करावा लागतो. मला घरातील कामांमध्ये मदतीसाठी अन्य कुणाची गरज होती असे एजलिनने म्हटले आहे. एजलिनने इन्स्टाग्रामवर पती आणि स्वत:चे एक छायाचित्र शेअर करत आम्ही अद्याप साथ आहोत, अजूनही मजबूत होत आहोत असे नमूद केले आहे.

योग्य युवती शोधण्यासाठी मी अनेक मॅचमेकिंग कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. अखेर पतीला स्वत:च नवी पत्नी मिळाली. मी आणि माझी सवत दोघेही पतीसोबत प्रत्येकी एक आठवडा राहतो असे एजलिन सांगते.

Advertisement
Tags :

.