महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेकरीचे शटर उचकटून सव्वा लाख लंपास

10:58 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सदाशिवनगर येथे रविवारी मध्यरात्री चोरी

Advertisement

बेळगाव : चोऱ्या, घरफोड्या थांबता थांबेनात. सदाशिवनगर स्मशानभूमीजवळील एका बेकरीचे शटर उचकटून 1 लाख 20 हजार रुपये रोकड पळविण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एल. जे. अय्यंगार बेकरीचे शटर उचकटून गल्ल्यातील रोकड पळविण्यात आली आहे. बेकरी चालकाने एका व्यवहारासाठी आणलेला पैसा आपल्या गल्ल्यात ठेवला होता. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री शटर बंद करून त्यांनी कुलूप लावला होता. सिद्धप्पा इरकर, रा. सदाशिवनगर हे बेकरी चालवतात. रविवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास दोघा अज्ञातांनी शटर उचकटून बेकरीत प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच एपीएमसीच्या पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीनंतर चोरट्यांनी बेकरीचे शटर उघडेच ठेवले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या एका परिचिताने बेकरी चालकाशी संपर्क साधून इतक्या लवकर बेकरी का उघडलात? अशी विचारणा केली. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article