महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सातव्या टप्प्यात कलंकितांची संख्यावाढ

06:03 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता पूर्ण होत आली आहे. सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी संपले. येत्या शनिवारी, अर्थात 1 जूनला मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा होणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा असेल ती प्रथम 1 जूनलाच संध्याकाळी साडेसात पासून प्रसिद्ध होणाऱ्या मतदानोत्तर सर्वेक्षणांच्या निष्कर्षांची. तसेच नंतर 4 जूनला होणाऱ्या प्रत्यक्ष मतगणनेची. मतदाराच्या सातव्या टप्प्यात ‘कलंकित’, अर्थात ज्यांच्या नावावर गंभीर गुन्हे नोंद आहेत, अशा उमेदवारांची संख्या सर्वात अधिक आहे. तसेच धनवान उमेदवारही मोठ्या संख्येने आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्मस्’ (एडीआर) या संघटनेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीचा हा सविस्तर आढावा...

Advertisement

कलंकितांची संख्या किती...

Advertisement

?         सातव्या टप्प्यात एकंदर 56 मतदारसंघांमध्ये मतदान होते आहे. एकंदर उमेदवारांची संख्या 904 असून त्यांच्यापैकी 199 उमेदवारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. हे प्रमाण 22 प्रतिशत इतके आहे. या 199 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांनी दोषसिद्ध अपराध आपल्या नावावर आहेत, अशी नोंद त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केली आहे. तर 4 उमेदवारांनी हत्येचा अपराध नोंद आहे, असे स्पष्ट केले आहे. 27 उमेदवारांनी त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद आहे, असे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, तर 13 उमेदवारांनी महिलांविरोधी अपराध नोंद असल्याचे स्पष्ट केले आहे. या 13 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांनी महिलांवर बलात्कार केल्याचे गुन्हे असल्याची माहिती घोषित केलेली आहे.

तृणमूल काँग्रेस, सपचा क्रमांक प्रथम

? उमेदवारांची संख्या आणि कलंकितांचे प्रमाण यांचा विचार करता या टप्प्यात तृणमूल काँग्रेसचा क्रमांक प्रथम असल्याचे स्पष्ट होत आहे. या पक्षाच्या एकंदर 9 उमेदवारांपैकी 7 उमेदवार कलंकित आहेत. त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाच्या 9 उमेदवारांपैकीही 7 जण कलंकित आहेत. आम आदमी पक्षाच्या 13 उमेदवारांपैकी 5 जणांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. बिजू जनता दलाच्या 6 उमेदवारांपैकी 2 कलंकित आहेत. भारतीय साम्यवादी पक्षाच्या 8 उमेदवारांपैकी 4 कलंकित आहेत.

मोठ्या पक्षाची स्थिती काय...

? राष्ट्रीय आणि मोठ्या पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष यांचा समावेश होतो. बहुजन समाज पक्ष हा खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने लहान पक्ष असला तरी त्याने भारतभर आपले उमेदवार स्पर्धेत ठेवले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 51 उमेदवारांपैकी 23 जणांविरोधात गुन्हे नोंद आहेत. काँग्रेसच्या 31 उमेदवारांपैकी 12 जणांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्या 56 उमेदवारांमध्ये 13 जणांवर गुन्हे नोंद आहेत.

अतिगंभीर गुन्हे कितींवर...

? समाजवादी पक्षाच्या 9 उमेदवारांपैकी 6 जणांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. भारतीय साम्यवादी पक्षाच्या 8 उमेदवारांमधील 4 जणांविरोधात, भारतीय जनता पक्षाच्या 51 उमेदवारांमध्ये 18 जणांविरोधात, काँग्रेसच्या 31 उमेदवारांपैकी 7 जणांच्या विरोधात, शिरोमणी अकाली दलाच्या 13 उमेदवारांपैकी 4 जणांविरोधात, तृणमूल काँग्रेसच्या 9 पैकी 3 जणांविरोधात, तर बहाजन समाज पक्षाच्या 56 उमेदवारांपैकी 10 जणांविरोधात गंभीर गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती आहे.

किती धनवान उमेदवार...

? सातव्या टप्प्यातील एकंदर 904 उमेदवारांपैकी 299, अर्थात जवळपास 33 प्रतिशत उमेदवारांची संपत्ती 1 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. कोट्याधीश उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. या पक्षाच्या 51 उमेदवारांपैकी 44 उमेदवार कोट्याधीश आहेत. तर काँग्रेसच्या 31 उमेदवारांपैकी तब्बल 30 उमेदवार धनवान आहेत. इतर पक्षांमध्येही श्रीमंत उमेदवारांची संख्या मोठी आहे, अशी माहिती एडीआरने प्रसिद्ध केली आहे.

? सातव्या टप्प्यातील उमेदवारांची सरासरी संपत्ती 3.27 कोटी रुपये इतकी आहे. पक्षांचा विचार करता सरासरी संपत्ती शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवारांकडे सर्वाधिक असल्याचे दिसून येते. ही सरासरी 25.68 कोटी रुपये आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या सरासरी संपत्तीपेक्षा अकाली दलाच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती बरीच जास्त आहे. समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांचेही कोट्याधीश आहेत.

सर्वात धनवान उमेदवार कोण...

? सातव्या टप्प्यात सर्वात धनवान उमेदवार असण्याचा मान शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरन कोर बादल यांनी मिळविला आहे. त्यांनी 198 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे बैजयंत पांडा यांचे नाव असून ते ओडीशाच्या केंद्रपाडा मतदारसंघात उमेदवार आहेत. त्यांनी 148 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. तृतीय क्रमांकावरही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय टंडन असून ते चंदीगढ या मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. त्यांनी 111 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिमाचल प्रदेशातील उमेदवार विक्रमादित्यसिंग आहेत. त्यांच्याकडे 111 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पाचव्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कंगना राणावत असून त्यांनी 91 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. वैशिष्ट्या असे की विक्रमादित्यसिंग आणि कंगना राणावत एकमेकांच्या विरोधात मंडी मतदारसंघातून स्पर्धेत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article