महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना आदरांजली

10:25 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगुंदी येथे कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन : तालुक्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

गेल्या 68 वर्षांपासून लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. आपली मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी सीमावासीय धडपडताना दिसत आहेत. भाषावार प्रांतरचनेवेळी सीमाभागावर अन्याय झाला आहे. अनेक आंदोलने करूनही सीमावासियांना न्याय मिळाला नाही. याची खंत आहे. कन्नडसक्ती लागू होऊन 38 वर्षे झाली. आमच्या मराठी माणसाला अल्पसंख्याक कायद्यानुसार हक्क आणि अधिकार मिळाले नाहीत. सीमाभागात लोकशाही लागू होत नाही का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना श्र्रद्धांजली ठरणार आहे. तसेच जोपर्यंत प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत हा सीमालढा तेवत ठेवणे हे सीमावासियांचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन तालुका म. ए. समितीचे नेते मनोज पावशे यांनी बेळगुंदी येथे केले.

कन्नड सक्तीविरोधात संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने पुकारलेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात बेळगुंदी येथील हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांना गुऊवार दि. 6 रोजी हुतात्मा चौक बेळगुंदी येथे तालुका म. ए. समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या हुतात्म्यांनी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात आपले रक्त सांडले, प्रश्न सुटावा म्हणून बलिदान दिले. या सर्वांचा त्याग सीमाप्रश्नासाठी महत्त्वाचा आहे. 6 जून 1986 रोजी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात बेळगुंदी येथे झालेल्या गोळीबारात भावकू चव्हाण, कल्लाप्पा उचगावकर, माऊती गावडा या तिघांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. गुऊवारी हुतात्मा चौक बेळगुंदी येथे तालुक्मयाच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

हुतात्मा स्मारकाचे पूजन मनोज पावशे यांनी केले. अशोक यल्लाप्पा पाटील यांनी श्रीफळ वाढविले. प्रारंभी दोन मिनिटे सर्वांनी स्तब्धता पाळून हुतात्म्यांना श्र्रद्धांजली वाहिली. या हुतात्म्यांचे बलिदान विसरून चालणार नाही. सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्ही साऱ्यांनी एकजुटीने सीमाप्रश्नासाठी कार्य केले पाहिजे, असे रामचंद्र पाटील यांनी सांगितले. तऊणांनी हुतात्म्यांचा इतिहास जाणून घ्यावा, असे माजी जि. पं. सदस्य शिवाजी शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, समितीचे नेते परशराम पाटील आदींनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. किरण मोटणकर, सुभाष हदगल, देवाप्पा शिंदे, राजू किणयेकर, शट्टूgपा चव्हाण, जोतिबा उचगावकर, विलास हुबळीकर, नागेंद्र गवंडी, माऊती शिंदे, यल्लाप्पा कुन्नूरकर, विश्वनाथ चव्हाण, महेश पाऊसकर, कृष्णा बाचीकर, नारायण गवंडी, विवेक पाऊसकर, डॉ. व्ही. एम. सातेरी, विठ्ठल बागीलगेकर, निंगुली चव्हाण, नारायण पाऊसकर, गोपाळ शिंदे, परशराम शहापूरकर, कृष्णा बिजगर्णीकर आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव शिवसेनेतर्फे बेळगुंदी येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालून श्र्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article