For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग तिसऱ्या दिवशीही घसरण सत्र

06:06 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलग तिसऱ्या दिवशीही घसरण सत्र
Advertisement

आयटी समभाग मोठ्या प्रमाणात नुकसानीत : जागतिक पातळीवरील वातारणाचाही प्रभाव

Advertisement

मुंबई :

भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. परकीय गुंतवणूकदारांनी समभागांची प्रचंड विक्री केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण थांबू शकली नाही. याशिवाय 5 नोव्हेंबरला अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये काळजीचे वातावरण आहे. दरम्यान, आयटी समभागांनी मोठ्या घसरणीतून टिकून राहण्यात यश मिळविले असल्याचे दिसून आले.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसईचा सेन्सेक्स दिवसअखेर 138.74 अंकांनी घसरून 0.17 टक्क्यांसोबत निर्देशांक 80,081.98 वर बंद झाला. त्याचवेळी, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 36.60 अंकांनी किंवा 0.15 टक्क्यांनी घसरून 24,435.50 वर बंद झाला.

क्षेत्रांच्या निर्देशांकाची स्थिती?

क्षेत्रांच्या निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी आयटी हे एकमेव क्षेत्र होते जे 1 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी नोंदवू शकले. भारतीय शेअर बाजारात आयटी आणि बँकिंगचे समभाग वधारले तर बाजार मजबूत होतो.

या व्यतिरिक्त निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मीडिया, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि वित्तीय सेवा क्षेत्रे घसरणीत बंद झाले. आज सर्वात मोठी घसरण फार्मा क्षेत्रात झाली. फार्मा क्षेत्रातील समभाग एकूण 1.56 टक्क्यांनी घसरले. तर, इतर क्षेत्रांमध्ये 1 टक्केपेक्षा कमी घसरण झाली.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक 4.95 टक्क्यांनी वाढत बंद झाले. बजाज फायनान्सचा शेअर आज 7007.95 रुपयांवर बंद झाला. याशिवाय टेक महिंद्रा, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि कोटक बँक यांचे शेअर्स वाढले. यासह निफ्टी-50 मध्ये 50 समभागांमध्ये केवळ 18 समभाग वाढू शकले. निफ्टी-50 मधील टॉप गेनर शेअर्समध्ये बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो आणि एचडीएफसी बँक टॉप-5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले.

सेन्सेक्समधील 22 समभाग बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्राच्या समभागांमध्ये 3.23 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण दिसून आली. याशिवाय सनफार्मा, पॉवरग्रिड, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, एलअँडटी, आयसीआयसीआय बँक, टायटन, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडियाचे समभाग 1 टक्केपेक्षा जास्त तोट्यासह बंद झाले.

 घसरणीचे कारण

अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या रॉयटर्स/इप्सॉस सर्वेक्षणात कमला हॅरिस यांना 46 टक्के मते मिळाली, ट्रम्प यांच्यापेक्षा 3 टक्के आघाडी. पोलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना 43 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. अशाप्रकारे, अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानापूर्वी, अनेक सर्वेक्षणांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची स्पर्धा दिसून येते. विजेत्याची शक्यता स्पष्ट नसल्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता निर्माण होत आहे.

Advertisement
Tags :

.