महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चौथ्या सत्रात सेन्सेक्स 1,062 अंकांनी कोसळला

01:15 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टीचा प्रवास 22 हजाराच्या खालीच : सलगच्या विक्रीचा बाजारात परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

एफआयआयच्या सलगच्या विक्रीमुळे भारतीय भांडवली बाजारात गुरुवारी चौथ्या सत्रात तेजीचा प्रवास खंडीत होत सेन्सेक्सने तब्बल 1000 अंकांच्या घसरणीची नोंद केली आहे. यामध्ये सेन्सेक्ससोबतच निफ्टीलाही घसरणीचा दणका बसला आहे. बीएसईमध्ये मिडकॅपचा निर्देशांक हा 2 टक्क्यांनी घसरणीसह स्मॉलकॅपही 2.4 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स हा दिवसअखेर 1062.22 अंकांनी म्हणजेच 1.45 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसोबत निर्देशांक 72,404.17 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 345.00 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 1.55 टक्क्यांनी प्रभावीत होत 21,957.50 वर बंद झाला आहे.

भारतीय बाजार का घसरतोय?

शेअर बाजारांशी संबंधीत विश्लेषण करणाऱ्या अभ्यासकांनी सांगितले आहे की, भारतामधील लोकसभेचे वातावरणामुळे विदेशी गुंतवणूकदारांच्याकडून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यामुळे याचा नकारात्मक परिणाम हा चौथ्या तिमाहीमधील निकालावर होत असल्याचे चित्र  आहे. यासोबतच अमेरिकन डॉलरमधील मजबूत स्थिती, अमेरिकन व्याजदरांमधील कपातीमधील अनिश्चितता आणि इंडिया व्हीआयएक्समधील सलगची तेजी यामुळे भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरणीचा कल राहिल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे. मुख्य कंपन्यांमध्ये गुरुवारी सेन्सेक्समध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोच्या तिमाही निकाल हा पाच टक्क्यांपेक्षा अधिकने घसरणीत राहिला आहे. यासोबतच एशियन पेन्ट्स, जेएसडब्लू स्टील, आयटीसी, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.  अन्य कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचे समभाग हे लाभात राहिले आहेत.

अन्य संकेत

जागतिक घडमोडींमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभात राहिला आहे. तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे नुकसानीत राहिले. युरोपीय बाजारात सुरुवातीला मात्र मिळताजुळता कल राहिला होता. विदेशी संस्थाच्या गुंतवणूकदारांनी बुधवारी 6,669.10 कोटी रुपये किमतीच्या समभागांची विक्री केली आहे. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.48 टक्क्यांनी वधारुन 83.89 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article